Chia Farming: थेट विक्री पर्यायातून वाढविले नफ्याचे मार्जीन

Agriculture Innovation: अमरावतीतील सिंदी येथील संतोष रोही यांनी पारंपरिक शेतीच्या जोडीला चिया लागवड सुरू केली असून, थेट विक्रीच्या माध्यमातून चांगला नफा मिळवला आहे.
Farmer Santosh Rohi
Farmer Santosh RohiAgrowon
Published on
Updated on

Amravati News: कुटुंबाची जमीनधारणा कमी असल्याच्या कारणामुळे हातावर हात धरून न बसता सिंदी (ता. अचलपूर) येथील संतोष रोही यांनी भाडेतत्त्वावर ३५ एकर शेती कसण्यात सातत्य राखले आहे. या माध्यमातून कौटुंबीक उत्पन्नात वाढीचा उद्देश त्यांना साधता आला. त्याबरोबरच यंदा त्यांनी चिया लागवड करीत त्याच्या थेट विक्रीचा पर्याय अवलंबीला आहे.

पारंपरिक पिकाच्या जोडीला व्यवसायिक पिके घेतली तर हा पर्याय संपन्नतेची वहिवाट प्रशस्त करण्यास पूरक ठरतो, याच विचारातून सिंदी येथील संतोष रोही या शेतकऱ्याने प्रयोगशीलतेवर भर दिला आहे. रोही कुटुंबीयांची जेमतेम सात एकर जमीनधारणा. संतोष सांगतात, की या शिवारात सोयाबीन, तूर तर रबी हंगामात हरभरा अशा प्रकारची पीक घेतली जातात.

Farmer Santosh Rohi
Farmer Success Story: यांत्रिकीकरण व्यवसायातून मजूरसमस्या केली दूर

याच्या जोडीला ते दरवर्षी ३० ते ३५ एकर शेती भाडेतत्त्वावर कसण्यासाठी घेतात. यावर्षी काही कारणामुळे मोठ्या क्षेत्राची उपलब्धता झाली नाही. परिणामी त्यांना २६ एकर शेतीच भाडेतत्त्वावर मिळाली. करारदार शेतकरी स्वतः चार एकर क्षेत्रातील पिकाचे व्यवस्थापन करणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असे ते सांगतात.

त्याबरोबरच मजूर उपलब्धतेची समस्या हे देखील कारण यामागे असल्याची माहिती त्यांनी दिली. पारंपरिक पिकाच्या जोडीला संतोष यांनी २०२४-२५ मध्ये पहिल्यांदा चिया तसेच एक एकरावर रेड किनोवा अशी व्यावसायिक लागवड केली. याच्या जोडीला एक गुंठ्यात कलोंजी लावली आहे.

Farmer Santosh Rohi
Chia Seed Farming : करडई, चियासीडमधील ‘योगऋषी’

चियाची पॅकिंग करून विक्री

चियामध्ये आरोग्याला पोषक असे अनेक घटक आहेत. त्यामुळे याला मागणी देखील अधिक राहते. ही बाब लक्षात घेता चांगला परतावा मिळण्यासाठी म्हणून संतोष यांनी थेट विक्रीवर भर दिला आहे. २५० ग्रॅम तसेच अर्धा किलो पॅकिंगमध्ये चियाची थेट विक्री होते. २३ हजार रुपये क्‍विंटल तसेच पाव किलो २०० रुपयांना तर अर्धा किलो ४०० रुपयांना चिया विकल्या जात आहेत. आतापर्यंत ५० ते ६० किलो चियाची विक्री केल्याचे ते सांगतात.

दोन किलो बियाणे व व्यवस्थापनकामी लागणारे सेंद्रिय घटक व इतर साहित्य अशा या किटकरिता साडेतीन हजार रुपये आकारण्यात आले होते. एकरी सहा क्‍विंटलची उत्पादकता मिळाली. सोयाबीन काढणीनंतर नोव्हेंबरमध्ये चिया लागवड करण्यात आली. १२० दिवस कालावधीचे हे पीक आहे.
संतोष रोही, शेतकरी, सिंदी, अमरावती (मो. ९७३०५०४९४९)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com