Voter List Updating : अकोला जिल्ह्यात २७ हजार १५३ मतदारांची वाढ

Election Commission : निवडणूक आयोगाकडून एक जुलै या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
Voter Registration
Voter RegistrationAgrowon
Published on
Updated on

Akola News : निवडणूक आयोगाकडून एक जुलै या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यात २७ हजार १५३ मतदारांची वाढ झाली आहे.

प्रारूप व अंतिम मतदार याद्यांची तुलना करता अंतिम मतदार यादीमध्‍ये ९ हजार ६६२ पुरुष, तर १७ हजार ४८९ महिला व २ तृतीयपंथी अशा २७ हजार १५३ इतक्‍या मतदारांची वाढ झाली आहे. पुनरीक्षणात पुरुष मतदारांच्‍या तुलनेत स्‍त्री मतदारांची ७ हजार ८२७ ने अधिक नाव नोंदणी झाली. ही वाढ २.२७ टक्के इतकी आहे.

Voter Registration
Election Commission : निवडणूक आयोगातर्फे विशेष निरीक्षकांची नियुक्ती

५९२९ तरुण मतदार वाढले

सहा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या प्रारूप मतदार यादीमध्‍ये एकूण १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्‍या ही २६ हजार ६१६ इतकी होती. ती अंतिम मतदार यादीमध्‍ये ३२ हजार ५४५ इतकी झाली आहे. एकूण ५९२९ इतक्‍या तरुण नवमतदारांची वाढ असून सदर वाढ ही २२ टक्के आहे. अंतिम मतदार यादीनुसार, जिल्ह्यात ८ लाख २६ हजार ६५१ पुरुष, सात लाख ८८ हजार ७६७ स्त्रिया, ४९ इतर असे एकूण १६ लाख १५ हजार ४६७ मतदार आहेत.

Voter Registration
Election Commission : प्रश्न निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा

नाव असल्याची खात्री करा ः जिल्हाधिकारी

मतदार याद्यांची प्रारूप प्रसिध्‍दी सहा ऑगस्टला करण्‍यात आली होती. त्यानंतर २० ऑगस्टपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्‍यात आल्या. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी (महसूल), सर्व उपविभागीय अधिकारी यांची कार्यालये, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल. अंतिम मतदार याद्यांचे अवलोकन करुन आपले नाव मतदार यादीमध्‍ये असल्‍याची खात्री सर्व मतदारांनी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार

अकोट विधानसभा मतदारसंघ तीन लाख ६ हजार ४६६ मतदार

बाळापूर मतदार संघ तीन लाख ६ हजार ५०६ मतदार

अकोला (पश्चिम) तीन लाख ४५४५०

अकोला पूर्व तीन लाख ५०१९४

मूर्तीजापूर तीन लाख ६८५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com