Election Commission : निवडणूक आयोगातर्फे विशेष निरीक्षकांची नियुक्ती

Appointment of Election Inspectors : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये प्रशासकीय व्यवस्था, सुरक्षा आणि उमेदवारांच्या खर्चांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
Election Commission
Election CommissionAgrowon

New Delhi News : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये प्रशासकीय व्यवस्था, सुरक्षा आणि उमेदवारांच्या खर्चांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

यासंदर्भात २८ मार्चला निवडणूक आयुक्त राजीवकुमार, ज्ञानेशकुमार, सुखबीरसिंग संधू यांची बैठक झाली होती. त्यात विशेष निरीक्षक पाठविण्याचे ठरले होते. निवडणूक आयोगातर्फे मंगळवारी (ता. २) याबाबतची औपचारिक घोषणा करण्यात आली.

Election Commission
Election Commission : राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश; प्रचार आणि रॅलीत मुलांचा वापर टाळा

सात कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि बिहार या चार राज्यांमध्ये त्यासोबतच आंध्रप्रदेश, ओडिशा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी विशेष निरीक्षक पाठविण्यात येणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेचा अनुभव असलेल्या व उत्कृष्ट सेवाकाळ राहिलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली. निवडणुकीत धनशक्ती, दंडेलशाही रोखण्याची यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.

Election Commission
Election Code of Conduct : अजूनही खतपोत्यांवरील मोदींच्या फोटोचा पेच सुटेना

निरीक्षकांची कामे

राज्यांच्या मुख्यालयांत मुक्काम अन् दौरे

स्थानिक प्रशासनात समन्वय

सर्वपक्षीय उमेदवारांना समान संधी देणे

निवडणुकीतील पैशाचा गैरवापर रोखणे

उमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवणे

आर्थिक प्रलोभनांना पायबंद घालणे

महाराष्टात यांच्याकडे जबाबदारी

धर्मेंद्र एस. गंगवार, एन. के. मिश्रा

मनजित सिंग आणि विवेक दुबे (बिहार)

अजय व्ही. नायक आणि मनमोहनसिंग (उत्तर प्रदेश)

राममोहन मिश्रा, दीपक मिश्रा (आंध्र प्रदेश)

योगेंद्र त्रिपाठी, रजनीकांत मिश्रा (ओडिशा)

आलोक सिन्हा, अनिलकुमार शर्मा (पश्चिम बंगाल)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com