Lemon Price : गरमी वाढली लिंबू दरात वाढ, आंबा, कलिंगडलाही जोरदार मागणी

Water Melon Rate : बाजारात गवार, वांगी, टोमॅटो, दोडका, कोबी दरात घसरण झाली आहे तर आंबा आणि कलिंगडला चांगली मागणी आली आहे.
Lemon Price
Lemon Priceagrowon

Lemon Prices : सध्या उन्हाच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. जसजशी गरमी वाढतीत तशी लिंबूच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. परंतु बाजारात लिंबूची आवक कमी असल्याने चांगल्या प्रतिचा एक नग दहा रुपयाला असा दराने विक्री होत आहे. दरम्यान बाजारात गवार, वांगी, टोमॅटो, दोडका, कोबी दरात घसरण झाली आहे तर आंबा आणि कलिंगडला चांगली मागणी आली आहे.

वाढत्या उन्हाच्या झळांमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी ठिकाणी लिंबूला मागणी वाढली आहे. त्यामुळे ७०० ते १००० लिंबू भरती पोत्यास ३ ते ६ हजार इतका दर घाऊक बाजारात झाला आहे. त्याचाच थेट परिणाम किरकोळ विक्रीवर झाल्याने लिंबू प्रतिनग दहा रुपये असा झाला आहे. अशी माहिती लिंबू व्यापारी समीर बागवान यांनी सांगितली.

भाजीपाल्याचे किरकोळ विक्रीचे दर प्रतिकिलो रुपयांमध्ये असे, कोबी १५ ते २५ प्रतिनग, वांगी- २० ते ३०, टोमॅटो १० ते १५, ओली मिरची ९० ते १००, ढब्बू मिरची ८०, गवारी देशी ६० ते ८०, जवारी ५० ते ६०, हिरवा वाटाणा ८०, कारली ४०, वरणा ५०, बिनीस ५०, हिरवा टोमॅटो २०, गाजर ४०.

फ्लॉवर २० ते ३० प्रतिनग, कोबी १५ ते २५ प्रतिनग, आले १००, देशी काकडी ४० रुपये, दुधी १५ ते २५ प्रतिनग, दिल्ली काकडी २०, कोथिंबीर १५ ते २५ रुपये प्रतिजुडी, मेथी १० रुपये प्रतिनग, अंबाडा १० रुपये प्रतिनग असा दर आहे.

कलिंगडचे भाव चढेच

वाढत्या उन्हाळ्याच्या झळा जशा जाणवू लागल्या, तसे कलिंगडाचे भाव वधारले आहेत. काळ्यापाटीचे नामधारी कलिंगड ५० ते १०० रुपये प्रतिनग झाले आहे.

आंब्याची आवक सुरू

देवगड हापूस - २५० ते ६०० रुपये १२ किंवा १५ नग, पायरी - ५०० रुपये डझन, केशर - ३५० रुपये डझन, रत्नागिरी हापूस २ ते ३००० रुपये फळाच्या आकारानुसार ४, ५ आणि ६ डझन पेटीचा दर आहे. अशी माहिती फळ व्यापारी नईम बागवान यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com