APMC Nashik : सिन्नर बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ

APMC Update : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात मागील वर्षीपेक्षा यंदा वर्षी २७ लाख २६ हजार १०८ रुपयांची वाढ झाली.
Sinnar Market Committee
Sinnar Market CommitteeAgrowon
Published on
Updated on

Nashik News : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात मागील वर्षीपेक्षा यंदा वर्षी २७ लाख २६ हजार १०८ रुपयांची वाढ झाली. समितीने या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर हिवरगाव उपबाजारात टोमॅटो तसेच पणन सुविधा केंद्राच्या जागेवर नव्याने ठाणगाव (टेंभुरवाडी) येथे वाटाणा व घेवड्याची खरेदी-विक्री सुरू केली. त्याचाही शेतकऱ्यांसह बाजार समितीला फायदा झाल्याचे दिसते.

माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत सत्ता स्थापन झाल्यानंतर कामकाजात बदल झाले आहेत. परिणामी, बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडली आहे. शेतकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी विविध विकासकामे करण्याचे निश्‍चित केले आहे.

Sinnar Market Committee
Arun Kale Dismissed : नाशिक बाजार समितीचे सचिव अरुण काळे बडतर्फ

बाजार समितीने सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्याने शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचे नियोजन केले आहे. संचालक मंडळाचा हा मानस असल्याचे सभापती डॉ. रवींद्र पवार, उपसभापती सिंधूताई कोकाटे, सचिव विजय विखे व संचालक मंडळाने सांगितले. या वर्षी पणन सुविधा केंद्राच्या जागेवर ठाणगाव (टेंभुरवाडी) येथे वाटाणा व घेवडा या शेतीमालाचा खरेदी-विक्रीचा प्रारंभ प्रायोगिक तत्त्वांवर करण्यात आला. फार वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी या निर्णयामुळे फळास आली. त्याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

ठाणगाव (टेंभुरवाडी) येथील उत्पन्न ७ लाख ९४ हजार ६०० रुपये आहे. हिवरगाव उपबाजारातील उत्पन्न २३ लाख ८० हजार तीनशे रुपयांनी वाढले आहे. शेतकरी व व्यापारी यांचा प्रायोगिक तत्त्वावर चांगला प्रतिसाद मिळाल्याने ठाणगाव उपबाजार घोषित करण्यास मंजुरी मिळण्यासाठी बाजार समितीने कृषी व पणन विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ठाणगाव उपबाजार आवारातही वीज, पाणी, स्वच्छतागृह, रस्ते आदी प्राथमिक सुविधा करण्यात येणार असल्याचे सभापती डॉ. पवार यांनी सांगितले.

Sinnar Market Committee
Onion Varieties : रब्बी, रांगडा लागवडीसाठी कांदा जाती

पूर्वीच्या तुलनेत या उपबाजारात व्यापाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. हिवरगाव उपबाजारात लवकरात लवकर कांद्याची खरेदी- विक्री सुरू करण्याच्या दृष्टीने बाजार समितीने ६० मेट्रिक टन क्षमतेचा वजनकाटा व बाजार समितीचे कार्यालय बांधकामाचा प्रस्ताव कृषी व पणन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यास मंजुरी आल्यानंतर कांद्याचे लिलाव हिवरगाव उपबाजार आवारात सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सभापती डॉ. रवींद्र पवार यांनी सांगितले.

बाजार समितीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्याचे आमचे पहिले वचन होते. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी सोयीसुविधा पुरविण्याचा बाजार समितीच्या संचालक मंडळाचा मानस आहे. बाजार समितीच्या मुख्य आवारात, तसेच उपबाजारांमध्ये पायाभूत सुविधा करण्यावर भर देण्यात येणार आहे.
राजाभाऊ वाजे,माजी आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com