Arun Kale Dismissed : नाशिक बाजार समितीचे सचिव अरुण काळे बडतर्फ

Nashik Bazaar Committee : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नाशिक बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांना राज्याचे सहसचिव डॉ. सुप्रिय धपाटे यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले.
नाशिक बाजार समिती
नाशिक बाजार समितीAgrowon

Nashik News : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नाशिक बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांना राज्याचे सहसचिव डॉ. सुप्रिय धपाटे यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार बाजार समितीने एक महिन्याच्या आत त्यांची खातेनिहाय चौकशी केली त्यात ते दोषी निष्पन्न झाले. कर्तव्यात कसूर करणे काळे यांना भोवले असून, त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश सभापती देवीदास पिंगळे यांनी दिले.

नाशिक जिल्ह्यातील दोनशे शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदी प्रकरणात झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत येथील बाजार समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून त्यांना खुलासा सादर करण्याबाबत सूचित केले होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिक बाजार समिती
Paddy Harvesting : भातपीक कापणीत पावसाचा अडथळा

तसेच माजी संचालक शंकरराव धनवटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर तत्कालीन पणनमंत्री यांनी काळे यांच्या भ्रष्ट व गैरकारभाराची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाईबाबत निर्देश दिले होते. तसेच, काळे यांनी सादर केलेला खुलासा शासन स्तरावरून अमान्य करण्यात आला होता.

नाशिक बाजार समिती
Crop Production : कमी पावसाचा पीक उत्पादनाला फटका

शासन आदेशानुसार सभापती देवीदास पिंगळे यांनी निलंबनाचे व खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा उपनिबंधक यांनी केलेल्या आदेशानुसार खातेनिहाय चौकशी महिन्याच्या आत पूर्ण होऊ नये, यासाठी काळे हे राहते घर व मोबाईल बंद करून बाहेर गेल्यामुळे बाजार समिती प्रशासनाला आरोपपत्रांची अंमलबजावणी करता आली नव्हती.

त्यामुळे प्रशासनाने १२ पानी आरोपपत्र काळे यांच्या घराबाहेरील गेटवर चिकटवून दिले होते. चौकशी ९ ते १७ ऑक्टोबरला नाशिक रोड येथील पी. व्ही. लोखंडे यांच्या कार्यालयात मनोज नागापूरकर यांच्याद्वारा सुरू झाली होती. यात १३ जणांची साक्ष नोंदविण्यात आली, तसेच काळे यांनादेखील साक्षीदारांची उलट तपासणी घेण्याची संधी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com