Onion Varieties : रब्बी, रांगडा लागवडीसाठी कांदा जाती

Rabi Season : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप आणि रांगडा लागवडीसाठी विकसित केलेली कांदा जातीमध्ये अनेक प्रकार आहेत.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे

फुले समर्थ

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप आणि रांगड्यासाठी विकसित केलेली जात.

कांदे उभट गोल असून, चमकदार गर्द लाल रंगाचे.

कांद्यांची माण बारीक, पातीची वाढ मर्यादित. कांदा पोसण्याचा वेग जास्त.

हा वाण तीन ते चार आठवडे आधी तयार होतो. लागवडीपासून ८० ते ९० दिवसांत.

खरीप हंगामात लागवडीनंतर ७५ ते ८५ दिवसांत, तर रांगडा ८५ ते १०० दिवसांत तयार होतो.

कांद्याला पक्वता येताच नैसर्गिकपणे संपूर्ण पात पडते. त्यामुळे पाण्याच्या २ ते ३ पाळ्यांची बचत होते.

सरासरी उत्पादन (हेक्टरी) : खरीप हंगाम : २५ टन, रांगडा : ३० ते ३५ टन.

साठवणक्षमता : २ ते ३ महिने

एन २-४-१

पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राद्वारे विकसित.

रब्बी हंगामासाठी शिफारस.

कांदे गोलाकार मध्यम ते मोठे, रंगाला विटकरी तर चवीला तिखट.

साठवणक्षमता : पाच ते सहा महिने

जांभळा करपा रोग व फुलकिड्यांना सहनशील.

लागवडीनंतर १२० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन : हेक्टरी ३० ते ३५ टन.

Onion
Sugarcane FRP : उसाला योग्य भाव मिळावा ; नंदूरबादमधील शेतकऱ्यांची मागणी

फुले सफेद

रांगडा तसेच रब्बी हंगामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे १९९४ मध्ये विकसित.

कांदे चमकदार रंगाचे मध्यम गोल.

विद्राव्य घन पदार्थांचे प्रमाण १३ ते १४ टक्के.

निर्जलीकरण करून कांद्याच्या चकत्या तसेच पावडर निर्मितीसाठी योग्य.

साठवणक्षमता : २ ते ३ महिने

सरासरी उत्पादन : हेक्टरी २० ते २५ टन

फुले सुवर्णा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याद्वारे १९९७ मध्ये विकसित

खरीप, रब्बी आणि रांगडा हंगामासाठी शिफारस

कांदे पिवळ्या किंचीत विटकरी रंगाचे, गोलाकार, घट्ट, मध्यम तिखट.

निर्यातीस व साठवणीस योग्य.

लागवडीपासून ११० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन : हेक्टरी २३ ते २४ टन.

कांदा- लसूण संशोधन संचनालयाद्वारे, राजगुरुनगर, (जि. पुणे) यांच्याद्वारे विकसित जाती

भीमा राज

गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये खरीप व रांगडा हंगामासाठी प्रसारित.

रांगडा व रब्बी हंगामात लागवडीनंतर ११५ ते १२० दिवसांत काढणीस येतो.

फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील.

सरासरी उत्पादन : (प्रति हेक्टर)

खरीप : हेक्टरी २४ ते २६ टन.

रांगडा : ४० ते ४५ टन.

रब्बी : २५ ते ३० टन.

साठवणक्षमता :

रांगडा हंगाम : ४ महिने, रब्बी हंगाम ः २ ते ३ महिने.

भीमा रेड

रांगडा आणि रब्बी हंगामासाठी.

रांगडा व रब्बी हंगामात लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन : (प्रति हेक्टर)

रांगडा : ४५ ते ५० टन.

रब्बी : ३० ते ३२ टन.

साठवणक्षमता : रांगडा ४ महिने, तर रब्बी हंगामामध्ये ३ महिन्यांपर्यंत.

फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील.

Onion
Drought Crisis : दुष्काळसदृश मंडलांनाही दुष्काळी सवलती मिळाव्यात

भीमा किरण

लागवडीनंतर १२५ ते १३५ दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन : हेक्टरी २८ ते ३२ टन.

साठवणक्षमता : ५ ते ६ महिने.

बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणत सहनशील

भीमा सुपर

गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत रांगडा हंगामासाठी उपयुक्त.

रांगडा हंगामामध्ये लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन : रांगडा : हेक्टरी ४० ते ४५ टन.

साठवणक्षमता : रांगडा हंगामामध्ये ३ महिन्यांपर्यंत.

जास्तीत जास्त कांदे एका डोळ्याचे असतात. त्यामुळे निर्जलीकरण करून तळेलेले काप (रिंग) तसेच सलाड बनविण्यासाठी उत्तम.

फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणत सहनशील

भीमा शक्ती

लागवडीनंतर रांगडा व रब्बी हंगामामध्ये १२५ ते १३५ दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन

(प्रति हेक्टर) :

रांगडा हंगाम : ३५ ते ४० टन,

रब्बी हंगाम ; २८ ते ३० टन.

साठवणक्षमता : ५ ते ६ महिने.

फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com