Nachani Cultivation : नाचणीच्या लागवडीत वाढ

Nachani Crop : भात कापणीनंतर कोकणातील दऱ्या-खोऱ्यातील शेतकरी नाचणी, वरी या तृणधान्याच्या पिकाची कापणीत व्यग्र आहेत.
Nachani cultivation
Nachani cultivationAgrowon

Mumbai News : भात कापणीनंतर कोकणातील दऱ्या-खोऱ्यातील शेतकरी नाचणी, वरी या तृणधान्याच्या पिकाची कापणीत व्यग्र आहेत. पारंपरिक लागवडीपेक्षा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्‍या लागवडीमुळे यंदा तृणधान्य घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरासरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे.

यंदोच वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले असून रायगड जिल्ह्यात कृषी विभागाकडून तृणधान्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. परिणामी नाचणी, वरीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

कृषी क्षेत्रात घट होऊन ते दोन हजार हेक्टरपर्यंत आले आहे. त्‍यात वरीसाठी ३७२ हेक्‍टर तर नाचणीसाठी ३,६४२ हेक्टर इतके क्षेत्र लागवडीखाली आहे. तृणधान्यापासून (मिलेट) पौष्टिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्‍या नाचणी, वरीपासून बनवलेले विविध पदार्थांची प्रसिद्धी करण्यात आल्याने तृणधान्याला मागणी वाढली आहे. या संधीचा फायदा घेऊन जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी नाचणी, वरीच्या पिकाचे क्षेत्र वाढवले.

Nachani cultivation
Base Price Purchase Scheme : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भात व नाचणी, नोंदणीस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

पूर्वी रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरूड, तळा, म्हसळा, सुधागड या तालुक्यात तृणधान्याचे मुबलक पीक घेतले जायचे. विशेषत: आदिवासी बांधव या पिकाची लागवड करत. कालांतराने आंबा, काजू पिकाखालील क्षेत्र वाढल्याने तृणधान्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाले. तृणधान्याचे महत्त्व ओळखून पुन्हा या पिकाखालील क्षेत्र वाढवून आधुनिकता आणण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे.

Nachani cultivation
Agriculture Technology : सोयाबीनसह हरभरा बीजोत्पादनात ‘मास्टरी’

२०२३ हे वर्ष रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम गावापर्यंत पौष्टिक तृणधान्याची लागवड ते प्रक्रियेबाबत वर्षभर मार्गदर्शन करण्यात आले आहे. याशिवाय अनुकूल वातावरणामुळे वाल, चवळी, मूग, मटकी आदी प्रकारच्या कडधान्यांच्या पेरणीही मोठ्या प्रमाणात केली आहे.

आरोग्यासाठी पोषक

तृणधान्याच्या वापरातून मिळणारे आवश्यक पोषणतत्त्वे-मिलेट्स किंवा पौष्टिक तृणधान्य, भरडधान्य हे शरीरातील आम्लता कमी करणारे असून, ते ग्लुटेन विरहित, अत्यंत पोषक आणि पचनास सुलभ आहेत. मिलेट्सचा ग्लासेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर संतुलित राखण्याचे कार्य तृणधान्य करतात.

आहारातील यांच्या वापरामुळे वजन कमी होण्यास मदतच होते. कॅल्शियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी महत्त्वाची शरीरास आवश्यक घटक द्रव्ये यातून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर आवश्यक तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स, फॉलिक ॲसिड, विटामिन बी ६, बीटा कॅरोटीन, बी १ आणि चेतातंतूंचे कार्य अधिक सक्षम बनविण्यास लागणारे लेसिथिन तृणधान्यातून मिळतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com