Fodder Production : चारा पिकांच्या क्षेत्रात तीन हजार हेक्टरने वाढ

Fodder Farming : यंदाच्या उन्हाळी हंगामात चारा पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
Fodder Crop
Fodder CropAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला शाश्वत पाणी देणाऱ्या ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात चारा पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या हंगामात ४५१९ हेक्टरवर चाऱ्याची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी हंगामात चाऱ्याची २ हजार ९८१ हेक्टरने वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Fodder Crop
Fodder Production : कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती

जिल्ह्यात गत वर्षी कमी पाऊस झाला. त्यातच परतीच्या पावसाने दडी मारली. परिणामी पाणीटंचाईसह चारा टंचाईचे सावट निर्माण झाले होते. त्यामुळे जित्राब जगवण्यासाठी चारा विकत कोठून घ्यायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. जिल्हा नियोजन समितीमध्ये चारा पिकासाठी दर वर्षी अनुदान दिले जाते. त्या माध्यमातून पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांना चाऱ्याचे बियाणे वाटप करतात.

गतवर्षात पहिल्या टप्प्यात ३० लाखाचे, तर दुसऱ्या टप्प्यात ७० लाखाचे बियाणे असे एकूण ७ हजार २७२ शेतकऱ्यांना ४१ हजार ८१६ किलो मोफत बियाण्याचे वाटप करण्यात आले होते. परंतु चारा पिकाला पाणी कमी पडण्याची भीती निर्माण झाली होती. दुष्काळी पट्ट्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या सिंचन योजनांचे आवर्तन सुरू केले.

Fodder Crop
Fodder Shortage : वागद शिवारात गोधन चाऱ्याअभावी विक्रीला

त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. त्यामुळे पशुसंवर्धन शेतकऱ्यांना विभागाकडून मिळालेल्या चारा बियाणे मार्च एप्रिल महिन्यात चारा पिकाची लागवड केली. तसेच शेतकऱ्यांनी स्वःताही चारा बियाणे विकत घेऊन लागवड केली. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, या तालुक्यांत प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

तालुकानिहाय चारा पिकाची लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज १०५.०

जत ४१८.८

खानापूर ९२.०

वाळवा १२.०

तासगाव १४७.६

शिराळा २०४.०

आटपाडी २२४७.०

कवठेमहांकाळ ८७५.०

पलूस ०८.०

कडेगाव ४१४.०

एकूण ४५१९.४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com