Solapur News : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, २४ जुलैला प्रारूप तर २० ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. विधानसभेसाठी आता शहरात एक हजार ३५० मतदारांसाठी एक तर ग्रामीणमध्ये चौदाशे मतदारांसाठी मतदान केंद्र असेल, असा निर्णय झाला आहे. त्यानुसार यंदा जिल्ह्यात १२३ मतदान केंद्रे वाढली आहेत. आता विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ मतदारसंघांसाठी तीन हजार ७२२ मतदान केंद्रे असणार आहेत.
विधानसभेचीच मतदार यादी पुढच्या वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरली जाऊ शकते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी अनेक मतदार जिवंत असतानाही मतदार यादीत ते मृत असल्याची नोंद होती. तर अनेकजण त्याच गावात राहायला असतानाही स्थलांतर केल्याच्या नोंदी होत्या. त्यामुळे अनेकांना मतदान करता आले नाही.
या पार्श्वभूमीवर जिल्हा विधानसभेचीच मतदार यादी पुढच्या वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरली जाऊ शकते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी अनेक मतदार जिवंत असतानाही मतदार यादीत ते मृत असल्याची नोंद होती. तर अनेकजण त्याच गावात राहायला असतानाही स्थलांतर केल्याच्या नोंदी होत्या. त्यामुळे अनेकांना मतदान करता आले नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने साडेतीन हजार बीएलओंना सक्त सूचना पारदर्शकपणे घरोघरी जाऊन सर्व्हे करायला सांगितले. त्यानुसार मतदार नोंदणी सुरू आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात एकूण तीन हजार ५९९ मतदान केंद्रे होती. यंदा मतदारांची संख्या फिक्स करण्यात आली असून, त्यानुसार आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण तीन हजार ७२२ केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. काही केंद्रांवर निश्चित संख्येपेक्षा अधिक मतदान होत असल्यास ते अतिरिक्त मतदान शेजारील कमी मतदान होणाऱ्या केंद्रांवर होईल, असेही नियोजन ठरले आहे.
बुधवारी प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या नवमतदारांची नोंदणी सुरू आहे. २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर त्यावरील हरकती, दावे, दुरुस्तीसाठी २५ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत मुदत असणार आहे. त्या हरकती, दाव्यावर १९ ऑगस्टपर्यंत सुनावणीअंती निर्णय होतील. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ज्या मतदारांनी नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. voters.eci.gov.in व voter helpline app यावरून मतदारांना नाव नोंदणी करता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.