Drought Crisis : संपूर्ण मोहोळचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

Maharashtra Drought : राज्य सरकारने राज्यातील नव्याने ४० मंडलांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत केला आहे, मात्र मोहोळ तालुका त्यातून वगळला आहे.
Drought Condition
Drought ConditionAgrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्य सरकारने राज्यातील नव्याने ४० मंडलांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत केला आहे, मात्र मोहोळ तालुका त्यातून वगळला आहे. परंतु संपूर्ण मोहोळ तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करावा, अशी मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.

Drought Condition
Advance Crop Insurance : वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘अग्रिम’ची रक्कम मिळणार

वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की एका बाजूला मोहोळ तालुक्यातील सिंचनाच्या योजना अपूर्ण असल्याने पाण्याची टंचाई असते, आणि दुसऱ्या बाजूला या वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे,

Drought Condition
Drought Update : दुष्काळग्रस्त तालुक्यांत काटेकोर उपाययोजना करा

शेतकरी हवालदील झालेला असताना राज्य सरकारच्या दुष्काळग्रस्त यादीत मोहोळचा समावेश झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.

परिणामी, त्यावरच्या उपाययोजना आणि योजनांपासून मोहोळ तालुक्यातील शेतकरी वंचित राहणार आहेत, याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने मोहोळ तालुक्याचा तीव्र दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com