Drought Update : दुष्काळग्रस्त तालुक्यांत काटेकोर उपाययोजना करा

Drought Condition : जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
Maharashtra Drought
Maharashtra Drought Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी उपरोक्त दुष्काळग्रस्त तालुक्यात टंचाई उपायोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादयांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता संतोष गाडेकर, कृषी विकास अधिकारी परमेश्‍वर वाघमोडे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एस. नरळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी डी. जी. महिंद्रकुमार, सहायक अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ, ए. एच. गायकवाड उपस्थित होते.

Maharashtra Drought
Grape Advisory : द्राक्ष घड जिरण्याच्या विकृतीवरील उपाय

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने जिल्ह्यातील माढा, करमाळा, बार्शी, सांगोला व माळशिरस या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून सवलती लागू करण्यास शासनाची मंजुरी दिली आहे.

त्यानुसार तहसीलदार यांनी जमीन महसूलमध्ये सूट देण्याबाबतची अधिसूचना काढावी, संबंधित गाव कामगार तलाठी यांनी जमीन महसुलाची कोणत्याही प्रकारे वसुली करण्यात येऊ नये. जिल्ह्यातील बँकांनी पीककर्जाचे पुनर्गठन करावे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची जबरदस्तीने कर्ज वसुली करण्यात येऊ नये, आवश्यकतेनुसार नवीन कर्ज पुरवठा करावा. शेतीशी निगडित कर्जाची कोणत्याही प्रकारे वसुली करण्यात येऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले.

Maharashtra Drought
Orange Processing Unit : नागपूरसह पाच ठिकाणी संत्रा प्रक्रिया केंद्रे

कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या चालू वीजबिलातून ३३.५ टक्के वीजबिल माफ करावे, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित करू नये. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीमध्ये सवलत द्यावी. शांळामध्ये माध्यन्ह भोजन योजना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी. तसेच मध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केल्या.

उर्वरित तालुक्यांचा अहवालही पाठवणार

जिल्ह्यात सरसकट पाऊस झालेला नाही. जाहीर केलेल्या पाच तालुक्यांशिवायही उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट आणि मंगळवेढा या सहा तालुक्यांतही संभाव्य दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन तो अहवालही शासनाला तत्काळ पाठविण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com