Pasha Patel: नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा उत्पादन खर्चात समावेश करा: पाशा पटेल

Joint Agresco: परभणी येथे झालेल्या ५३ व्या जॉइंट अॅग्रेस्कोमध्ये राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीचा शेती उत्पादन खर्चात समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
Joint Agresco
Joint AgrescoAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: हवामान बदलामुळे शेतीपुढील संकटे वाढली आहेत. या स्थितीत कृषी विद्यापीठांना पिकांचा उत्पादन खर्च काढण्याच्या पद्धतीत बदल करावे लागतील. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा त्यात समावेश करून त्याअनुषंगाने संशोधन करून शिफारस कराव्यात, असे निर्देश राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन विकास समिती बैठक-२०२५ चा (जॉइंट अॅग्रेस्को) समारोप कार्यक्रमात शनिवारी (ता.३१) ते बोलत होते.

Joint Agresco
Joint Agresco 2025: ‘वनामकृवि’त ‘जॉइंट ॲग्रेस्को’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

यंदाच्या जॉइंट अॅग्रेस्कोमध्ये चार कृषी विद्यापीठांचे २५ वाण, १८ अवजारे, २२५ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्यक्षस्थानी होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र कृषी परिषदेचे सदस्य विनायक काशिद, जनार्दन कातकडे, डॉ. विठ्ठल शिर्के, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे (अकोला), डॉ. खिजर बेग (परभणी), डॉ. किशोर शिंदे (एमसीएआर), शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आदी मंचावर उपस्थित होते.

पाशा पटेल म्हणाले, ‘‘हवामान बदलामुळे २०३३ नंतर शेतीपिकाच्या उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. उच्च तापमान तसेच थंडीमुळे शेतीपिकासोबत फळपिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. हवामान बदलांना सामोरे जाताना कृषी शास्त्रज्ञांना नव्याने विचार करावा लागेल.

Joint Agresco
Agriculture Department: मलईदार पदांच्या स्पर्धेला आयुक्तांनी लावला चाप

कृषी अर्थशास्त्र विभाग आणि हवामान विभाग यांनी समन्वयातून काम करावे लागेल. तापमान वाढीचे युग संपले असून आता होरपळीचे युग सुरू झाले आहे. कर्ब उत्सर्जन थांबविण्यासाठी पेट्रोल, कोळसा या इंधनांचा वापर बंद करावा लागेल. हरित पट्टे निर्माण करण्यासाठी तत्काळ अंमलबजावणी करावी लागेल. बांबू लागवडीचा प्रचार व प्रसार करावा लागेल.

डॉ. गडाख म्हणाले, की कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी भरीव निधीची गरज आहे. आर्थिक स्वायत्ता हवी आहे. त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी पाशा पटेल यांच्याकडे केली.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की रिक्त पदांमुळे संशोधन, शिक्षण, विस्तार कार्यात खीळ बसली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेचा शासनाने पुनर्विचार करावा. शास्त्रज्ञांनी विविध तांत्रिक सत्रातील अहवालाचे सादरीकरण केले. त्यानंतर जॉइंट अॅग्रेस्कोच्या इतिवृत्त पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुढील वर्षभरात निवृत्त होणाऱ्या शास्त्रज्ञांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. २०२६ मध्ये ५४ वे जॉइंट अॅग्रेस्को दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

२५ वाण, १८ अवजारे, २२५ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित.....

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ४ वाण, २ अवजारे, ५३ तंत्रज्ञान शिफारशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ८ वाण, ३ अवजारे, ६१ तंत्रज्ञान शिफारशी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ११ वाण, ९ अवजारे, ६१ तंत्रज्ञान शिफारशी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे २ वाण, ४ अवजारे, ४२ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित करण्यात मान्यता देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com