
Solapur News : बदलत्या जीवनशैलीत मानवी आहारात भरड धान्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्याचा वापर सर्वाधिक करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय भरडधान्य संशोधन संस्था, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. परशुराम पात्रोटी यांनी उपळाई बुद्रुक (ता. माढा) येथे व्यक्त केले.
आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि खरीप हंगामपूर्व नियोजन प्रसारासाठी विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, राष्ट्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांच्यामार्फत आयोजित कार्यक्रमात डॉ. पात्रोटी बोलत होते. उपळाई बुद्रुकचे सरपंच दिगंबर माळी, संदीप ढोले, उपकृषि अधिकारी, श्री घोडके, सहायक कृषी अधिकारी, शुशांत गायकवाड हे उपस्थित होते.
डॉ. पात्रोटी म्हणाले, की भरड धान्यातील पौष्टिक तत्त्वे जाणून घ्या, आहारात भरपूर वापर करा, चांगल्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. शेतकऱ्यांनीही त्याची गरज ओळखून, भरडधान्याला अधिकाधिक प्राधान्य द्यावे, असे सांगताना त्यांनी भरडधान्यातील विकसित वाण, बियाण्यांची उपलब्धता, लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. शिल्पा परशुराम राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंब पिकावरील कीड व रोग याबद्दल मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र मोहोळचे दिनेश क्षिरसागर यांनी कृषी मालाचे मूल्यवर्धन, फळे व भाजीपाला निर्जलीकरण उद्योग, कडधान्य प्रक्रिया, आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. पंकज मडावी यांनी खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन, एआय आधारित फेरोमॅन ट्रॅप्स, अशा विविध नवीन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
श्रीमती काजल जाधव म्हात्रे यांनी माती व पाणी परीक्षण आधारित खत व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. अविनाश चंदन, तालुका कृषी अधिकारी माढा यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेबद्दल माहिती दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.