Millets Use: भरडधान्याचा वापर वाढला पाहिजे

Food Industry: भरडधान्याचा आहारातील उपयोग वाढवण्यासाठी त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. भरडधान्याच्या चवदार आणि पौष्टिक उत्पादनांनी नवउद्योजकांसाठी नवे मार्ग खुले होत आहेत.
Indo Maze Millet Development Association
Indo Maze Millet Development AssociationAgrowon
Published on
Updated on

Pune News: आहारातील पोषणमूल्य कमी होत असताना, भरडधान्याचा वापर वाढला पाहिजे. यासाठी भरडधान्यांपासून चविष्ट प्रक्रिया पदार्थांची निर्मिती वाढविण्याची गरज असून, याद्वारे नवउद्योजक तयार होणार आहेत. सध्या भरडधान्यावर आधारित लघुउद्योजकांना देखील प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत भरडधान्य उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या ‘इंडो मेझ मिलेट डेव्हलपमेंट असोसिएशन’च्या (ईमडा) वतीने ‘भरडधान्यातील संधी’ या विषयावर मंगळवारी (ता.४) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत सांडसे, स्मार्ट प्रकल्पाचे सुशांत पवार, राष्ट्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योजकता संस्थेचे प्रा. प्रारब्ध बडगुजर, ग्रॅंड थ्रॉटंटच्या शुभ्रा देशपांडे, ट्रू एलिमेंटचे संचालक श्रीजित मुळे, मेलो फूडच्या ऋतुजा पाटील, फूड नेस्टच्या प्रीती देशमुख यांच्यासह विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, लघुउद्योजक उपस्थित होते.

Indo Maze Millet Development Association
Millet Festival : कोल्हापुरात भरणार मिलेट, फळ महोत्सवाची मेजवानी

या वेळी बोलताना श्रीजित मुळे म्हणाले, की जगात गहू आणि मैद्याचा गेल्या ७०-८० वर्षांत आहारात मोठा वापर वाढला आहे. याची विशिष्ट चव नागरिकांनी स्वीकारली आहे. मात्र गहू आणि मैदा आता आरोग्याला हानीकारक ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत झाले आहे. यामुळे आहारात आता ज्वारी, बाजरी, नाचणीच्या भाकरीचा वापर वाढला आहे. आपल्या लहानपणी किंवा आताही ग्रामीण भागात ज्वारीची शिळी भाकरी दुधात एकत्र करून नाष्ट्याला खाण्याची पद्धत आहे.

Indo Maze Millet Development Association
Healthy Millets : बहुगुणी भरडधान्य

हा सर्वांत पौष्टिक आहार असून, यामध्ये मूल्यवर्धन करून आम्ही ज्वारीची बिस्किटे केली आहेत. भरडधान्याची उत्पादने ही चविष्ट करण्यावर भर देण्याची गरज आहे. प्रीती देशमुख म्हणल्या, की सुकामेव्यापेक्षा भरडधान्यामध्ये पोषणमूल्य अधिक आहे. त्यामुळे भरडधान्याचा आहारात वापर वाढला पाहिजे. यासाठी भरडधान्यांचे उपपदार्थ बनविताना नीविन्‍यता आणि चवदार उत्पादने झाली पाहिजेत.

प्रा. बडगुजर म्हणाले, की राष्ट्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योजकता संस्थेने विविध भरडधान्यांच्या उपपदार्थांवर संशोधन केले आहे. तर यासाठी लहान-लहान मशिनरींची देखील निर्मिती केली आहे. याचा वापर लघुउद्योजकांनी करावा. या वेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. शुभ्रा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सांडसे यांनी असोसिएशनची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com