Rain Update : पावसाची उघडीप; पिकांमध्ये वाफसा

Rain News : गेले आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परंतु तुरळक ठिकाणी हलक्या सरी बसरत आहेत.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेले आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परंतु तुरळक ठिकाणी हलक्या सरी बसरत आहेत. विदर्भ आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत गडचिरोलीतील धानोरा येथे ४६ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात घट झाली असून कापूस, सोयाबीन, तूर, मूग, बाजरी अशी पिके वाफसा अवस्थेत आली आहे.

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतातील ओलावा काही प्रमाणात होणार आहे. त्यातच अनेक ठिकणी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे पिकांची वाढ चांगली असून पिके चांगलीच तरारली आहेत. कोयना घाटमाथ्यावर ५२ मिलिमीटर पाऊस पडला असून ताम्हिणी ४२, भिरा ३६, दावडी ३४, शिरगाव, आंबोणे ३२ मिलिमीटर पाऊस झाला.

Rain Update
Rain News : जुलैतील पावसाने घेतले चार बळी

तर लोणावळा, शिरोटा, ठाकूरवाडी, वळवण, वाणगाव, भिवपुरी, खोपोली, खांड, धारावी या घाटमाथ्यावर हलका पाऊस झाला. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील धसइ, नयाहडी, सरळगाव मंडलांत हलका पाऊस पडला. रायगडमधील चौक येथे २० मिलिमीटर, तर खोपोलीत तुरळक पाऊस झाला असून रत्नागिरीतील कळकवणे मंडलात २३, शिरगांव येथे २१ मिलिमीटर, तर चिपळूण, खेर्डी, सावर्डे, पालघरमधील तलवड मंडलात हलका पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील काले, कार्ला येथे २९ मिलिमीटर तर खडकाळा, लोणावळा, शिवणे हलका पाऊस झाला. तर कोल्हापुरातील गगनबावडा येथे तुरळक सरी पडल्या. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील मोरांबा, मोलगी येथे २५ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडत होते. मराठवाड्यातील नांदेडमधील माहूर येथे ३२, सिंदखेड येथे १४ मिलिमीटर झाला.

Rain Update
Rain News : कुकडी खोऱ्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा

अनेक भागात पाऊस नव्हता. विदर्भातील वाशीममधील कुपटा, शेंदूर्जन, गिरोली, उमरी हलका, तर अमरावतीतील धारणी, हरीसळ ३१, धुळघाट, सदराबल्दी, चिखलदरा, सेमडोह ३१, चुर्णी, टेंभूरसोंडा, वरूड, शेंदुर्जना ४६, शिरजगाव २९, पुसाळा २१ मिलिमीटर तर भेनोडा, अचलपूर रासेगाव, पारसपूर, पाथरोट, परवाडा, चांदूर, बेलोरा, करजगाव, तळेगाव, ब्राह्मणवाडा तुरळक सरी बरसल्या.

यवतमाळतील दिग्रज, कळगाव येथे २० मिलिमीटर, तिवरी, तूपटाकळी २०, सिंगड, अर्णी ३२, जवळा, लोनबेहल, बोरगाव ३२ मिलिमीटर तर अंजनखेड येथे तुरळक सरी पडल्या. गोंदियातील मुल्ला येथे ३४, देवरी, सिंदबीरी, दारव्हा २३, शेंदा ४१ मिलिमीटर, गडचिरोलीतील धानोरा येथे ४६ मिलिमीटर, तर चाटेगाव, पेंढरी, नागपूरमधील पारशिवणी, नावेगाव येथे हलका पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com