Rain Alert : बहुतांश ठिकाणी हलका काही ठिकाणी मध्यम पाऊस

Marathwada Rain : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील २१० मंडलांपैकी १६२ मंडलांत बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील २१० मंडलांपैकी १६२ मंडलांत बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली. सार्वत्रिक पावसाचा मात्र सर्व दूर अभावच दिसला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८४ पैकी ५८ मंडलांत पाऊस झाला. बहुतांश मंडळात तुरळक, हलका झालेला हा पाऊस काही मंडळात मध्यम स्वरूपाचा झाला. जालना जिल्ह्यातील ४९ मंडलांपैकी ३५ मंडळात पावसाची तुरळक, हलकी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची हजेरी लागली. बीड जिल्ह्यातील एकूण ७७ मंडलांपैकी ६९ मंडलात तुरळक, हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

Rain Update
Rain Update : मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ४२९८ मिलिमीटर पाऊस

जिल्हानिहाय पावसाची मंडले

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

कचनेर ११, पिंपळवाडी ६.३, बालानगर ११.५, नांदर २३, लोहगाव ६.५, ढोरकिन २२.५, बिडकीन २९.५, पाचोड २०.८, विहामांडवा २५, आपेगाव २४.३, निलजगाव २९.५, भेंडाळा १३.५, शेंदूरवादा १२, तुर्काबाद ६.५, जामगाव १०, शिवूर ५.३, बोरसर ५.३, जानेफळ १२, सिल्लोड ७.५.

Rain Update
Rain Update : मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ४२९८ मिलिमीटर पाऊस

जालना जिल्हा

वरुड १२.८, अंबड ७, धनगर पिंपरी ६, गोंदी १९.८, सुखापुरी २२.५ ,परतुर १९.५, घनसावंगी १०, राणी उचेगाव ७.३, तीर्थपुरी २०.५.

बीड जिल्हा

पारगाव सिरस ८.३, थेरला ६.३, अमळनेर ६, कडा ४२.३, धामणगाव ८.५, मादळमोही १९.८, जातेगाव १३.३, पाचेगाव ९.८, धोंडराई ११.८, उमापूर ११, सीरसदेवी १३, तलवाडा ४०, माजलगाव ५, गंगामसला ५, किट्टी आडगाव १०.८, तालखेड ११.५, नित्रुड ८.८, पाटोदा ७.८, केज १४.३, हनुमंत पिंपरी ९.५, नांदुर घाट २५, चिंचोली माळी ८, नागापूर ५.८, सिरसाळा ३०, पिंपळगाव ११.३, रायमोहा ८.३, ब्रम्हनाथ येळंब ७, गोमलवाडा १०.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com