Loksabha Election : सोलापुरात मतदार यादीवरील तक्रारींची चौकशी होणार

Voter Complaints Investigation : तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करून, मतदार यादीची दुरुस्ती केली जाईल,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
Collector Kumar Ashirwad
Collector Kumar AshirwadAgrowon

Solapur News : ‘‘जिल्ह्यात सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले, पण मतदानादिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या. अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती.

दुसरीकडे अनेकांकडे मतदान कार्ड होते, तर मतदार यादीत नाव नव्हते, अनेकांच्या नावातील बदलामुळे त्यांना मतदान करता आले नाही, आता या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करून, मतदार यादीची दुरुस्ती केली जाईल,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

Collector Kumar Ashirwad
Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

‘‘सोलापूर लोकसभा मतदार संघात २० लाख ३० हजार ११९, तर माढा मतदार संघात १९ लाख ९१ हजार ४५४ मतदारांची नोंदणी झाली होती. यंदा किमान ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, असा विश्वास प्रशासनाला होता. गावोगावी मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. मतदानावर बहिष्कार घातलेल्या गावांमध्येही मतदान झाले,

मात्र मतदानासाठी केंद्रावर आलेल्यांना मतदान न करताच परतावे लागले, त्यासंदर्भात संबंधित सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडे व थेट जिल्हाधिकाऱ्य़ांकडेही तक्रारी आल्या. आता त्याची चौकशी होईल. पडताळणी करून बीएलओंची चूक असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल,’’ असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले.

Collector Kumar Ashirwad
Loksabha Election 2024 : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

नेमकी चूक कोणाची?

जिल्ह्यातील तीन हजार ५९९ ‘बीएलओं’च्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम करण्यात आली. ‘बीएलओं’नी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मयत मतदारांची नावे कमी केल्याचा दावा प्रशासनाने यापूर्वी केला होता.

दुबार मतदारांची नावे देखील काढून टाकल्याचे सांगण्यात आले. परंतु मतदानावेळी हा दावा फोल ठरला. काहींची नावे चुकून डिलीट झाली, तर काहींची नावे स्थलांतरित म्हणून यादीत नव्हती. यात आता नेमकी चूक बीएलओंची की माहिती देणाऱ्या मतदारांची हे चौकशीतून समोर येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com