Loksabha Election 2024 : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Election 2024 Voting Update : गुजरातमधील २५, महाराष्ट्रातील ११ आणि उत्तर प्रदेशातील १० लोकसभा मतदार संघासह देशभरातील ९३ जागांसाठी मतदान झाले.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

New Delhi News : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी (ता. ७) १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान झाले. गुजरातमधील २५, महाराष्ट्रातील ११ आणि उत्तर प्रदेशातील १० लोकसभा मतदार संघासह देशभरातील ९३ जागांसाठी मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत आसाममध्ये सर्वाधिक ७४.८६ टक्के, तर महाराष्ट्रात सर्वात कमी ५३.४० टक्के मतदान झाले होते.

आसाम, महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांचा विचार केला तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत प. बंगालमध्ये ७३.९३ टक्के, बिहारमध्ये ५६.०१ टक्के, छत्तीसगडमध्ये ६६.८७ टक्के गोवा राज्यात ७२.५२ टक्के, गुजरातमध्ये ५५.२२ टक्के, कर्नाटकात ६६.०५ टक्के, मध्य प्रदेशात ६२.२८ टक्के, उत्तर प्रदेशात ५५.१३ टक्के मतदान झाले होते.

याशिवाय दादरा नगर हवेली आणि दमण दीवमध्ये ६५.२३ टक्के मतदान झाले होते. या टप्प्यात १३०० पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी पात्र असलेल्या मतदारांची एकूण संख्या १७.२४ कोटी इतकी असून १.८५ लाख मतदान केंद्रांवर मतदान पार पडले.

Loksabha Election
Loksabha Election 2024 : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

तिसऱ्या टप्प्यात आसाम (४), बिहार (५), छत्तीसगड (७), दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (२), गोवा (२), गुजरात (२५) तर कर्नाटक (१४), महाराष्ट्र (११), मध्य प्रदेश (८), उत्तर प्रदेश (१०) आणि पश्चिम बंगालमधील (४) जागांचा समावेश होता. सुरतची जागा भाजपने बिनविरोध जिंकली आहे. चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी दहा राज्यातील ९६ मतदारसंघात मतदान होणार असून त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

मतदानासाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांचे स्थानिक लोकांनी जोरदार स्वागत केले. एका वृद्ध महिलेने मोदी यांनी राखी बांधली. तर मोदींची स्वाक्षरी घेण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली. देशाची निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक व्यवस्थापन यातून अन्य देश खूप काही शिकू शकतात, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी मतदानानंतर दिली. अमित शहा यांनी मतदान करण्यापूर्वी पत्नी सोनल यांच्यासोबत कामेश्वर महादेव मंदिरात पूजा केली.

Loksabha Election
Loksabha Election 2024 : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यांनी मैनपुरीमध्ये मतदान केले. डिंपल यादव मैनपुरीमधून निवडणूक लढवीत आहेत. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे मतदान केले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरीमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

पंतप्रधानांचे अहमदाबादमध्ये मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदान केले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याच शहरातील नारनपुरा भागात कुटुंबीयांसह मतदान केले. शहा हे गांधीनगर मतदार संघातून निवडणूक लढवीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com