Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

Election 2024 Update : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात झालेल्या ११ मतदार संघांमध्ये मंगळवारी (ता. ७) सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले.
Election
ElectionAgrowon

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात झालेल्या ११ मतदार संघांमध्ये मंगळवारी (ता. ७) सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले. राज्यात असलेल्या उन्हाच्या काहिलीमुळे दुपारनंतर मतदारांचा उत्साह कमी झाला होता.

मात्र सायंकाळी पाचनंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील बारामती, माढा, धाराशिव, लातूर, कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, सातारा, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ठिकाणी मतदान झाले.

सांगली : लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (ता. ७) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पलूस आणि लेंगरे या केंद्रांवर मशिन सुरू झाले नसल्याने मतदान एक तास उशिरा सुरू झाले. दुपारी पाच वाजेपर्यंत ५२.५६ टक्के इतके मतदान झाले. कोल्हापूर येथे ६३.७१, तर हातकंणगले येथे ६२.१८ टक्के मतदान झाले.

बारामती : येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.६८ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी पत्नी आणि उमेदवार सुनेत्रा पवार, आई आशादेवी पवार यांच्यासह मतदान केले. याबरोबरच ज्येष्ठ नेते शरद पवार, उमेदवार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले.

Election
Loksabha Election 2024 : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

सातारा : लोकसभा मतदार संघात पाच वाजेपर्यंत ५४.११ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान कोरेगाव विधानसभा मतदार संघात झाले. तर सर्वांत कमी मतदान पाटण मतदार संघात झाले. काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह १६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

सोलापूर आणि माढा : लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मंगळवारी (ता. ७) काही किरकोळ प्रकार वगळता मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर मतदार संघात ४९.८५ टक्के आणि माढा मतदार संघात ५०.१६ टक्के मतदान झाले.

सोलापूर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक चुरस सोलापुरातील शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर या मतदार संघात, तर माढा मतदार संघात फलटण आणि माळशिरसमध्ये पाहायला मिळाली.

कोल्हापुरात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कोल्हापुरातील उत्तरेश्‍वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत सुरू असलेल्या मतदान केंद्रावर महादेव श्रीपती सुतार (वय ६९ वर्षे, रा. उत्तरेश्‍वर पेठ, कोल्हापूर) या मतदान करायला गेलेल्या मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

सांगोल्यात ईव्हीएम मशिन पेटवले

बागलवाडी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील बूथ क्रमांक ८६ वर दुपारी एकच्या सुमारास दादासाहेब चळेकर हा तरुण ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणाबाजी करत आणि पाणी, चाराटंचाईच्या प्रश्‍नावर घोषणाबाजी करत मतदान केंद्रात घुसला आणि त्यानंतर त्याने थेट ईव्हीएम मशिनवर पेट्रोल टाकून मशिन जाळण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच या मशिनने पेट घेतला, पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करत लगेच आग विझवली.

Election
Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खडकवासला येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनची पूजा केल्यावरून त्यांच्यावर सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...या अकरा मतदार संघांत दुपारी ५ वाजेपर्यंत ५३.४० टक्के मतदान झाले

लातूर ५५.३८

सांगली ५२.५६

बारामती ४५.६८

हातकणंगले ६२.१८

कोल्हापूर ६३.७१

माढा ५०.००

धाराशीव ५२.७८

रायगड ५०.३१

रत्नागिरी- सिंधुदुर्ग ५३.७५

सातारा ५४.११

सोलापूर ४९.१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com