Rain Forecast : सोलापुरात पुन्हा सर्वदूर संततधार

Maharashtra Rain : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सोमवारी (ता. १०) सायंकाळी पुन्हा तो बरसला.
Rain Forecast
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सोमवारी (ता. १०) सायंकाळी पुन्हा तो बरसला. रात्री उशिरापर्यंत त्याची रिपरिप सुरूच होती. त्यानंतर मंगळवारी (ता. ११) पुन्हा पहाटेपासून पावसाची संततधार थांबून-थांबून सुरूच राहिली. जिल्ह्यातील बहुतेक सर्व भागांत सर्वदूर पाऊस व्यापल्याचे चित्र राहिले.

गेल्या काही दिवसांपासून सलग होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरण बदलून गेले आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाचा जोर मोठा राहिला. त्यानंतर पहाटेपर्यंत त्याची रिपरिप सुरू होती. त्यानंतर काहीशी उघडीप घेतल्यानंतर सकाळी सहापासून नऊपर्यंत पुन्हा संततधार सुरू राहिली.

Rain Forecast
Monsoon Update : मॉन्सूनची जळगाव, अकोला, पुसदपर्यंत मजल

जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ, बार्शी, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांत पावसाचा जोर राहिला. दिवसभर कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या सरी असे वातावरण राहिले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सलगपणे पाऊस पडत असल्याने अनेक भागात ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक शिवारातही पाणी साचून राहिले आहे.

Rain Forecast
Weather Forecast : वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

सलगच्या पावसामुळे मोहोळमधील आष्टे-कोळेगाव बंधारा भरल्याने मोहोळचा पाणीप्रश्न मिटला असून, या पावसामुळे तळाला गेलेल्या सीना नदीत पाणी वाहू लागले आहे. त्याशिवाय तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या असणारा आष्टी तलावही भरून वाहू लागला आहे. उत्तर सोलापुरातील पाकणी येथेही सीनानदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सांगोल्यातील जवळपास सर्वच मंडलांत २५ मिमीच्या पुढेच पाऊस झाला आहे. सांगोल्यात हात्तीद मंडलात सर्वाधिक ७५.३ मिमी पाऊस झाला. करमाळ्यातही सलग चौथ्या दिवशी पाऊस झाला. करमाळ्यात जून महिन्यात आतापर्यंत १२० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

उजनीच्या पाणीपातळीत वाढ

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने तिकडील धरणातील पाणी उजनीकडे सोडले जात आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळी ४८६७ क्युसेक इतके पाणी सोडले जात होते. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, दोनच दिवसांत ३ टक्क्यांपर्यंत पाणीपातळीत वाढ झाली. मंगळवारी धरणातील एकूण पाणी पातळी ४८५.५०० मीटर राहिली. तर एकूण पाणीसाठा ३२.७२ टीएमसी तर त्यापैकी उपयुक्त साठा उणे २९.९४ टीएमसी राहिला. तर या पाण्याची टक्केवारी उणे ५५.८८ टक्के राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com