Monsoon
Monsoon Agrowon

Monsoon Update : मॉन्सूनची जळगाव, अकोला, पुसदपर्यंत मजल

Monsoon Rain Update : अरबी समुद्रावरून प्रवाह अधिक बळकट झाल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) घोडदौड सुरूच आहे.
Published on

Pune News : अरबी समुद्रावरून प्रवाह अधिक बळकट झाल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) घोडदौड सुरूच आहे. मंगळवारी (ता. ११) सलग चौथ्या दिवशी मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग, विदर्भाच्या काही भागांत प्रगती केली आहे. जळगाव, अकोला, पुसदपर्यंतच्या मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा पोहोचली आहे.

यंदा मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत असल्याचे चित्र आहे. मोसमी वारे सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस अगोदर ६ जून रोजी महाराष्ट्रात डेरेदाखल झाले. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. ८) पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत देखील मॉन्सून पोहोचला होता. रविवारी (ता. ९) मॉन्सूनने मुंबईसह, ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्यांच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली.

Monsoon
Monsoon Rain : मराठवाड्याला पावसाने धुतले

सोमवारी (ता. १०) वाटचाल सुरूच ठेवत डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मजल मारली. तर मंगळवारी सलग चौथ्या दिवशी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांशी भाग, विदर्भाच्या काही भागांत मॉन्सून पोहोचला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. तेलंगणात काहीशी प्रगती करणाऱ्या मॉन्सूनची उर्वरित देशातील वाटचाल मात्र कायम आहे.

Monsoon
Monsoon 2024 : माॅन्सून विदर्भात दाखल; राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज

अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनची बंगालच्या उपसागरावरील शाखा मात्र मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘रेमल’ चक्रीवादळाने चाल दिल्याने यंदा सर्वसाधारण दीर्घकालीन वेळेच्या तब्बल १० दिवस आधीच (३१ मे) सिक्कीम आणि पश्‍चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सूनने मुसंडी मारली होती.

त्यानंतर उपसागरावरून मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने १२ दिवसांपासून पूर्व भारतातील मॉन्सूनची सीमा कायम आहे. उद्यापर्यंत (ता. १३) तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com