Milk Subsidy : खासगी प्रकल्पांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५ रुपये अनुदान द्या

Milk Rate : नाशिक जिल्ह्यातील खासगी प्रकल्पांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस. आर. शिरपूरकर यांना शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिले.
Milk Producer
Milk ProducerAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील खासगी प्रकल्पांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस. आर. शिरपूरकर यांना दूध उत्पादक, शेतकरी शीतकरण आणि प्रक्रिया संघटनेतर्फे राज्याध्यक्ष समाधान हिरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले.

राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. सहकारी दूध उत्पादक संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे एक जानेवारीपासून जाहीर केले आहे. दरम्यान या निर्णयाबाबत दूध उत्पादक संघटनेतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

Milk Producer
Milk Subsidy : दूध अनुदानामुळे कोल्हापूरला पावणेअठरा कोटींचा लाभ

सरकारने यावर सकारात्मक विचार करून मोडकळीस आलेला दूध व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी खासगी प्रकल्पांना दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा करावे. यासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींबाबत सर्व दूध उत्पादक मान्य असतील. खासगी संस्थांना दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित ठेवू नये,

अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. दूध उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळात जिल्ह्यातील सचिन कळमकर (येवला), मच्छिंद्र चिने (सिन्नर), प्रवीण चव्हाण (विंचूर), रूपेश वाबळे, संदीप शिंदे (निफाड), प्रशांत देशमुख, अमोल कापडणीस (बागलाण), डॉ. दिलीप सोनवणे, डॉ. रवींद्र पवार, गणेश जाधव, शामराव गुजर, संजय जाधव आदी सहभागी होते.

राज्यामध्ये एकूण दूध उत्पादनाच्या ७५ टक्के दूध हे खासगी दूध प्रकल्पांकडे असल्याने या अनुदानाचा लाभ फक्त २५ टक्केच दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

जिल्ह्यामध्ये फक्त सिन्नर तालुका दूध संघ सोडला तर एकही सहकारी संघ चालू स्थितीत नाही. सिन्नर दूध संघाकडे जेमतेम दहा हजार लिटरपर्यंत दूध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना या अनुदानाचा लाभ होणार नाही. सरकारने सहकारी आणि खासगी असा भेदभाव करणे योग्य नसल्याचे नमूद केले.

Milk Producer
Cow Milk Rate : 'राज्य सरकारच्या जाचक अटींमुळे दूध संस्थांनी बदलाला सामोरे जावे'
शेतकऱ्यांच्या मुळावर दुष्काळासारखे अस्मानी संकट असतानाच दूध उत्पादक शेतकऱ्यांबाबत दुजाभाव ठेवणे योग्य वाटत नाही. दूध उत्पादक शेतकरी मग तो दूध कुठेही घालेल त्याला सरकारने अनुदान दिले पाहिजे.
राजेंद्र पगार, दूध उत्पादक शेतकरी
सरकारने १ जानेवारीपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या निर्णयाची सरसकट अमंलबजावणी करून दुग्ध व्यवसाय वाचवावा.
समाधान हिरे, राज्य अध्यक्ष, दूध उत्पादक, शेतकरी शीतकरण व प्रक्रिया संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com