Maize Fodder : राधानगरी तालुक्यात वैरणीसाठी मका पिकाला पसंती

Fodder Update : उसाच्या लागणीत आंतरपीक म्हणून दाट मका लावायचा तर स्वतंत्रपणे माडा पद्धतीने वैरणीचे पीक घ्यायचे, असेच चित्र राधानगरी तालुक्यासह जिल्ह्यात दिसत आहे.
Maize Fodder
Maize FodderAgrowon

Kolhapur News : परिसरातील शेतकरी वैरणीसाठी मका पिकाकडे वळत आहेत. उसाच्या लागणीत आंतरपीक म्हणून दाट मका लावायचा तर स्वतंत्रपणे माडा पद्धतीने वैरणीचे पीक घ्यायचे, असेच चित्र राधानगरी तालुक्यासह जिल्ह्यात दिसत आहे.

राधानगरी तालुक्यात अंदाजे २५ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रात ऊसलागण होते. यापैकी १५ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागणीत आंतरपीक म्हणून वैरणीसाठी मका पीक घेतले जाते. १० ते १२ हेक्टरमध्ये फक्त माडा पद्धतीने वैरणीसाठी मका, हत्ती गवत घेतले जाते. ऊसदरापेक्षा वैरण करून दुग्धव्यवसाय केल्यास फायदा होतो, असे शेतकरी सांगतात.

Maize Fodder
Cactus Fodder : काटेविरहित निवडुंग जनावरांसाठी उत्तम हिरव्या चाऱ्याचा पर्याय

यातच काही वर्षांत ग्रामीण भागात गोठा प्रकल्प करून दुग्ध व्यवसायाकडेही युवावर्गही राबत आहे. यामुळे जनावरांची संख्याही वाढली; परिणामी वैरण कमी पडू लागली यासाठीच शेतकरी शेतातच वैरण पिकवू लागले आहेत. सध्या शिवारभर मक्याचे पीक डोलताना दिसत आहे. काही शेतकरी कारखान्याला ऊस न पाठवता पिकवलेलाच ऊस जनावरांना वैरण म्हणून वापरतात.

Maize Fodder
Fodder shortage : उन्हाच्या झळा वाढल्या, चारा करपला!; चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

उसाच्या तुलनेत फायदेशीर

आजघडीला मक्याची कुट्टी, हरभरा कळणा, शाळू कुट्टी, गव्हाचा भुस्सा विकत घ्यायला गेले तर १२ रुपये ते १५ रुपये प्रतिकिलो घ्यावे लागते तर मक्याची कुट्टी ८ ते १० रुपये प्रतिकिलो खरेदी करावी लागते. कारखान्याला ऊस पाठवल्यास फक्त ३ रुपये कवडीमोल दराने विकावा लागतो, यामुळेच शेतकरी पिकवलेला ऊस सरळ जनावरांना घालत आहेत. वैरण विकत घेऊन दुग्धव्यवसाय करणे परवडत नाही. त्यामुळे बळीराजा शेतात वैरणीसाठी पिके घेत आहेत.

माझा १० गायींचा गोठा आहे. सध्या उसापेक्षा वैरण पिकवली तरच फायदा दिसतो. मी २२ गुंठ्यातील ऊस सरळ कापून जनावरांना खायला घातला. यामुळे कारखान्याकडून येणाऱ्या पैशापेक्षा मला चांगला मोबदला मिळाला.
सुभाष भोईटे, शिरगाव, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com