Aslam Abdul Shanedivan
गेल्या वर्षी पावसाने मारल्या दडीमुळे शेतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पाऊस कमी झाल्याने धरणे आटली असून विहिरींनी तळ गाठला आहे
यामुळे हिरव्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे
दरम्यान सतत बदलणाऱ्या हवामानामुळे ज्वारी पिकावर बुरशीजन्य रोग पडला आहे. यामुळे जनावरे देखील कडबा खात नाहीत.Fodder shortage
चारा डेपो सुरु करण्याची मागणी हिरव्या चाऱ्याचे दर वाढले आहेत. याचे विदारक चित्र हस्तपोखरीतील धनगर पिपरी प्रकल्प क्षेत्रात दिसत आहे
धनगर पिपरी प्रकल्पात कायम असणारे पाणी यंदा मात्र आटले आहे. यामुळे चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
यामुळे जनावरे उपाशी मरण्यापेक्षा कमी भावात पशुपालक विकत आहेत. तर चारा डेपो देण्याची मागणी शासनाकडे शेतकरी करत आहेत.