Mahesh Gaikwad
सध्या राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पशुपालकांना हिरव्या चाऱ्याच्या टंचाईची समस्या भेडसावते.
उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांना वाळलेला चारा द्यावा लागतो. त्यामुळे मोठ्या जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते.
अशा परिस्थितीत जनावरांना हिरवा चाऱ्याला काटेविरहित निवडुंग हा चांगला पर्यायी चारा आहे.
उरळी कांचन, पुणे येथील बाएफ संस्थेने केलेल्या संशोधनातून शास्त्रीयदृष्ट्या शेळी आणि करडांमध्ये काटेविरहीत निवडुंगाचा चारा म्हणून वापर करण्यात आला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर केलेला हा अशा प्रकारचा देशातील पहिलाचा प्रकल्प आहे.
देशातील पडीक जमिनीमध्ये निवडुंगाच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा मानस आहे.
या निवडुंगापासून पशुखाद्य, नैसर्गिक चामडे, जैवइंधन, सेंद्रिय खत आणि फळांपासून प्रक्रिया उद्योगाला ग्रामीण भागात चालना मिळू शकते.