Animal Disease : नगर जिल्ह्यात जनावरांना लाळ्या खुरकुताची साथ

Animal Husbandry Department : पशुसंवर्धन विभागाकडून लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.
Animal Disease
Animal DiseaseAgrowon
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्ह्यात लम्पी स्कीन पाठोपाठ लाळ्या खुरकूतच्या साथीचा प्रादुर्भाव होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. अकोले तालुक्यात सात शेळ्यांचा लाळ्या खुरकुताने मॄत्यू झाला आहे. दुधाला कमी बाजार, पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे शेतकरी आधीच संकटात असतानाच लाळ्या खुरकूत आजारामुळे पशुपालक आणखी अडचणीत सापडला आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून दुधाचे भाव कमी आणि पशुखाद्याचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. लाळ खुरकूत हा विविध पशूंच्या प्रजातीमध्ये आढळणारा, वेगाने पसरणारा, मोठ्या प्रमाणावर पशूंची हानी करणारा रोग आहे.

Animal Disease
Animal Disease Control : लाळ्या खुरकूत आजारावर नियंत्रण

या रोगावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय असल्याचे पशुसंवर्धन विभाग सांगत आहे. जिल्ह्यासाठी १६ लाख लसी प्राप्त झाले असून लसीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात आहे. गोठ्यावर लाळ्या खुरकतसदृश आजार दिसल्यास त्या जनावरांना कळपापासून वेगळे करावे आणि त्याचे चारा पाणी स्वतंत्ररीत्या करावे.

बाजारातून होणारी जनावरांची खरेदी विक्री हे रोगाच्या प्रसाराचे एक प्रमुख कारण असल्याने बाजारातून नवीन जनावरे खरेदी करू नये. मध, लोणी व नाचणीचे पीठ यांचा लेप तोंडातील व्रणांवर द्यावा. तोंड व पायातील जखमा लवकर बऱ्या होण्याकरिता दोन टक्के खाण्याचा सोडा, १ टक्के पोटॅशिअम परमंग्नेट किंवा तुरटीच्या एक टक्के द्रावणाने दिवसातून दोन तीन वेळा धुवाव्यात. आजारी जनावरांची स्वतंत्र व्यक्तीद्वारे देखभाल करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Animal Disease
Animal Disease Management : लाळ्या-खुरकूत आजारावर उपचार

...अशी आढळतात लक्षणे

रोगाचे विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर एक ते पंधरा दिवसांत रोगाची प्रत्यक्ष लक्षणे दिसू शकतात. जनावरांना १०२-१०६ अंशापर्यंत तीव्र ताप येतो. जनावरांचे चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते. जिभेवर, हिरड्यावर, तोंडातील आतील भागावर, कासेवर, खुरामध्ये फोड येतात.

एक-दोन दिवसांत हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सरसारखी जखम होते. या जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही, जनावरे अशक्त होतात. बाजारातून जनावरे आणल्यानंतर आपल्या गोठ्यात न ठेवता १५ दिवस बाहेर ठेवले पाहिजे. तोंडखुरी-पायखुरी हा गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यांसारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे.

विषाणूचा प्रसार हवेतून, श्‍वासोच्छ्‌वास, पशूंच्या पाण्याची भांडी, शेण, मूत्र, दूध चारा, गव्हाणी, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, वाहने, पाळीव प्राणी, नवीन खरेदी केलेली जनावरे यांच्याद्वारे रोगाचा प्रसार होतो. गावातील जनावरे चराईसाठी आणि पाणी पिण्यासाठी एकत्रित सोडली जातात, त्या ठिकाणी रोगाचा प्रसार वेगाने होतो असे पशुतज्ज्ञांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com