Animal Disease Control : लाळ्या खुरकूत आजारावर नियंत्रण

Animal FMD : साधारणत: नोव्हेंबर ते जून महिन्यांपर्यंत लाळ्या खुरकूत आजाराची साथ राहते. या आजाराचा प्रसार अतिशय झपाट्याने होतो.
Animal Foot And Mouth Disease
Animal Foot And Mouth DiseaseAgrowon

Animal Care : साधारणत: नोव्हेंबर ते जून महिन्यांपर्यंत लाळ्या खुरकूत आजाराची साथ राहते. या आजाराचा प्रसार अतिशय झपाट्याने होतो. याचा संक्रमण काळ सुमारे ३ ते ७ दिवस आहे. जनावरास प्रथम ताप येतो. अन्न पाणी कमी होते, थकवा येतो, रुक्षपणा येतो, तोंडातून लाळ गळणे सुरु होते. तोंडातील आतील भागात जीभ, हिरड्या, ओठ, नाकपुड्यावर फोड येतात. हे फोड फुटल्यानंतर त्याचे व्रण तयार होतात. काही वेळेस जिभेवरील पूर्ण आवरण निघून जाते. त्यामुळे जनावरांना अन्न पाणी घेणे अशक्य होते.
१) जनावरांच्या तोंडातून सारखी लाळ गळते. तोंडाची हालचाल करणे कठीण होते.
२) काही वेळेस सड, कासेवर फोड येतात. नंतर व्रण होतात. खुरीवर फोड येतात, तेथे जखम होते. दुर्लक्ष केल्यास.
३) जनावरांचे खूर गळून पडतात. त्यामुळे जनावरास चालणे, फिरणे मुश्किल होते.

परिणाम ः
या रोगामुळे सामान्यत: मोठी जनावरे मरत नाहीत; परंतु दूध, मांस लोकर, कातडी उत्पादन आणि काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
आजारातून मुक्त झालेली जनावरे पूर्णपणे पुर्ववत कार्यक्षम होऊ शकत नाहीत. त्यांच्यामध्ये गर्भपात, वंधत्व येणे, अंगावर केसांची वाढ होणे, पांडू आजार, उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होते. दुग्धोत्पादन कमी होते.

Animal Foot And Mouth Disease
Animal Foot And Mouth Disease : लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रण

औषधोपचार ः
१) आजार विषाणूजन्य असल्यामुळे यावर औषधोपचार नाही. परंतु लक्षणावरून आपण उपचार करू शकतो त्यामुळे जनावरांना आराम मिळू शकतो.
२) जनावरांचे तोंड पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवावे. त्यानंतर जिभेवर बोरोग्लीसरीन, लोणी/ खोबरेल तेल आणि हळद यांचे मिश्रण लावावे. तोंडात जखमा झाल्यामुळे जनावरांना हिरवे कोवळे गावत खाण्यास द्यावे. पायाच्या जखमा पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवावेत. त्यानंतर औषधी मलम लावावे. दुय्यम आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने प्रतिजैविके आणि औषधोपचार करावेत.

प्रतिबंधात्मक उपाय :
१) वासरांना जन्मल्यानंतर ४५ दिवसांनी आणि त्यानंतर २.५ महिन्यांनी आणि तेथून पुढे दर सहा महिन्यांनी लसीकरण करावे. म्हणजेच सप्टेंबर- ऑक्टोबर आणि मार्च-एप्रिलमध्ये लसीकरण करावे. गाभण जनावरांना शेवटच्या काळात लस टोचू नये.
२) आजारी माद्यांना त्यांची वासरे पाजू नयेत.
३) बाधित जनावरांना कुरणात चारू नये.
४) बाधित जनावरे वेगळी बांधावीत. त्यांची निगा वेगळ्या मजुराकडून करून घ्यावी.


डॉ. बाबासाहेब घुमरे, ७७०९५११७४१
डॉ. विकास कारंडे, ९४२००८०३२३

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com