Wanrai Bund : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक वनराई बंधारे

Water Bunds : पावसाचे पडलेले पाणी नाल्याद्वारे वाहून न जाता ते अडविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
Water Bund
Water BundAgrowon
Published on
Updated on

Nanded News : पावसाचे पडलेले पाणी नाल्याद्वारे वाहून न जाता ते अडविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यात कृषी, जिल्हा परिषद, महसूलसह अन्य विभागामार्फत वनराई बंधारे बांधण्यात आली. नांदेड जिल्ह्यात या मोहिमेत विविध विभागांमार्फत आतापर्यंत ८८८ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत, मराठवाड्यात ही संख्या सर्वाधिक असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

अत्यल्प पाऊस पडणाऱ्या भागात वनराई बंधाऱ्यांची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात समोर आली आहे. कोणत्याची खर्चाविना लोकसहभागातून या बंधाऱ्यांची निर्मिती होत असल्याने यातून पावसाच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करता येतो.

Water Bund
Wanrai Bunds : अमरावती विभागात पूर्णत्वास आले २९०४ वनराई बंधारे

या बंधाऱ्यांमुळे पाण्याची टंचाई कमी होऊन जनावरांना या पाण्याचा उपयोग होतो. वनराई बंधाऱ्यांचे बांधकाम केल्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना आठ हजार ८०० वनराई बंधारे बांधण्याचे लक्ष्यांक देण्यात आले होते.

Water Bund
Wanrai Bunds : लोकसहभाग, श्रमदानातून पारगावला वनराई बंधारा

या मोहिमेत विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, व्यापारी मंडळे, गणेश मंडळे, महिला बचत गट, उत्पादक कंपन्या यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. मराठवाड्यात ८८०० लक्ष्यांकाच्या तुलनेत आजपर्यंत ३००० वनराई बंधारे बांधण्यात आली आहेत. यात सर्वाधिक नांदेडला ८८८, बीड ३४०, जालना ३२२, छत्रपती संभाजीनगर ३०४, हिंगोली ३०१, धाराशिव २८५, परभणी २८२, लातूर २७६ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

नांदेडला दीड हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित पाणी

वनराई बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासह जनावरांना, भाजीपाला आणि कडधान्य पिकांसाठी होतो. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यामध्ये वाळू, माती भरून आणि त्यांची तोंडे शिवून बंधाऱ्‍यासाठी वापरण्यात येतात. नांदेडमध्ये आजपर्यंत बांधण्यात आलेल्या ८८८ बंधाऱ्यांतून दीड हजार ते १७०० हेक्टरवरील पिकांना संरक्षित पाणी उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com