POCRA Scheme : पोकराच्या अवजारे ‘गायब’प्रकरणात नोटीस प्रक्रिया सुरु

POCRA Project : अकोला जिल्ह्यात सुमारे साडेतीन कोटींपेक्षा अधिक किमतीची अवजारे चौकशीदरम्यान दिसून आलेली नाहीत. या अवजारे वाटपाच्या प्रकरणात यंत्रणांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा ठपका समितीने आपल्या अहवालात ठेवल्याचे बोलले जाते.
POCRA Scheme
POCRA SchemeAgrowon

Latest Agriculture Newsनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत खरेदी केलेली अवजारे चौकशी समितीला प्रत्यक्ष भेटीवेळी दिसून आली नाहीत. त्यामुळे आता जिल्ह्यातील संबंधित गट व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकरणात प्रत्येक गट, कंपनीने खरेदी केलेल्या व आढळून न आलेल्या अवजाराचा तपशिल आणि त्याची किंमत समाविष्ट केली आहे. याबाबत योग्य ते स्पष्टीकरण मागवण्यात येत आहे.

POCRA Scheme
POCRA : ‘पोकरा’च्या अवजारे वाटपात यंत्रणांचेही दुर्लक्ष !

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांमध्ये अकोल्याचाही समावेश होता. या प्रकल्पाच्या अनुदान वितरणात अनेकांनी संगनमताने घोळ घातल्याचा संशय बऱ्याचदा व्यक्त झाला. मात्र, हे प्रकरण तेव्हा चव्हाट्यावर येऊ शकले नव्हते. जेंव्हा बुलडाणा जिल्ह्यातील चौकशी समितीने गट, शेतकरी कंपनीला दिलेल्या अवजारांची थेट तपासणी केली त्यावेळी काही मोजक्या गटांकडेच संपूर्ण साहित्य सुस्थितीत असल्याचे दिसून आले.

जवळपास ११६ गट, शेतकरी कंपन्यांकडे अवजारे, यंत्र खरेदीत अनियमितता दिसून आली आहे. याबाबत काहींनी साहित्य बाहेर गेले, नातेवाइकांनी नेले असे सांगत वेळ निभावून नेली. चौकशी अधिकाऱ्यांनी खातरजमा करण्यासाठी विविध पद्धतीने यंत्र दाखवा असे सुचवले तरीही ते दाखवता आलेली नाहीत. त्यामुळे याचा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सादर केला. त्यावर आता कारवाई सुरु झाली आहे.

POCRA Scheme
POCRA : ‘पोकरा’तून वाटप केलेल्या अवजारांचा पत्ता लागेना

योजनेतून खरेदी केलेली अवजारे सादर करण्याबाबत सूचविण्यात आले आहे. जेथे अवजार, यंत्र मिळून येणार नाही, त्यांच्याकडून संबंधित रक्कम वसुलीबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जाऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

या प्रकरणात गुरुवार (ता.१७) पासून कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची तयारी सुरु झाली. संबंधित गट, कंपनीच नव्हे तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनाही उत्तर मागितले जाणार आहे.

...अशी झाली अनियमितता...

  • ट्रॅक्टर खरेदी न करताच अवजारांची खरेदी करणाऱ्या गटाला दिले अनुदान

  • प्लॅंटर या एकाच घटकासाठी पूर्वसंमती व अनुदान

  • अवजारे ठेवण्यासाठी शेड बांधकाम करणे गरजेचे असतानाही बहुतांश गटांनी केलेच नाही, जुन्या अवजारांनाच रंगरंगोटी करून दाखवणे

  • दोन ठिकाणी तर एकही अवजार नसल्याचे समोर आले

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com