POCRA : ‘पोकरा’तून वाटप केलेल्या अवजारांचा पत्ता लागेना

Agriculture Implements : या साहित्याची तब्बल तीन कोटी ६३ लाख रुपये किंमत असून, याबाबतचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकामार्फत ‘पोकरा’च्या मुख्यालयाला पाठविण्यात आला होता.
POCRA
POCRA Agrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) पहिल्या टप्यात वाटप केलेल्या अवजारे बँकांचे बरेच साहित्य चौकशी समितीला दिसून आलेले नाही. या साहित्याची तब्बल तीन कोटी ६३ लाख रुपये किंमत असून, याबाबतचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकामार्फत ‘पोकरा’च्या मुख्यालयाला पाठविण्यात आला होता.

POCRA
POCRA Project : उत्पादकता वाढीसाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार

या प्रकरणाची कारवाई करण्यासाठी जिल्हा आत्मा यंत्रणेला पत्र देण्यात आले असून, चौकशीत दिसून न आलेली यंत्रे दाखवा किंवा वसुली भरा अशा प्रकारच्या नोटीस संबंधित गट, शेतकरी कंपन्या, अधिकाऱ्यांना बजावण्याची कारवाई लवकरच केली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात ‘पोकरा’ प्रकल्पातून गेल्या काळात अवजारे बँक तसेच मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणात वाटप झालेली आहेत. यामध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार बुलडाणा जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाचवेळी भेटी देऊन शेतकरी गट, कंपन्यांकडून अवजारे, यंत्रांबाबत माहिती घेतली होती.

POCRA
POCRA Project : ‘पोकरा’ प्रकल्प बंद; सोयाबीन बीजोत्पादक वाऱ्यावर

काही ठिकाणी ही यंत्रणा सुस्थितीत दिसून आली. मात्र काही गट, कंपन्यांच्या साहित्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली असल्याचा शेरा चौकशी अहवालात स्पष्टपणे देण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी १६४ अवजारे बँकांची तपासणी केली. त्यापैकी ४६ अवजारे बँकांच्या ठिकाणी अवजारे सुस्थितीत आढळलेली आहेत. ११६ गट, कंपन्यांकडे मंजुरीपेक्षा कमी अवजारे होती. विशेष म्हणजे दोन ठिकाणी तर एकही अवजार आढळून आलेले नाही. तीन कोटी ६४ लाख ९५ हजार ७७६ रुपये किमतीची अवजारे, यंत्रे दिसून आलेली नाहीत.

...या आहेत अनियमितता

- प्रकल्पाच्या सूचनांनुसार ट्रॅक्टरसह किमान पाच अवजारे खरेदी करणे बंधनकारक आहे. तथापि, एका गटाने ट्रॅक्टर खरेदी न करताच फक्त अवजारे खरेदी केले. तरीही या गटाला अनुदान देण्यात आले.

- एका गटाला तर फक्त प्लॅंटर या एकाच घटकासाठी पूर्वसंमती व अनुदान दिले.

- अवजारे बँक प्रकल्पासाठी शेडचे बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश अवजारे बँकांच्या ठिकाणी शेडचे बांधकाम केलेले नाही. अवजारे खुल्या जागेत ठेवलेली दिसली.

- काही गटांनी दाखवलेली अवजारे फार जुनी असून, काहींनी त्यावर नव्याने रंगरंगोटी केलेली दिसली.

- अवजारांवर प्रकल्पाचे नाव, लाभार्थी गटाचे नाव, वर्ष या बाबींनी एम्बोसिंग केलेल्या नाहीत.

- तीन गटांना दोन वेळा पूर्वसंमती देण्यात आली. दोन्ही पूर्वसंमतीमध्ये काही अवजारांची द्विरुक्ती झाली. या अवजारांना दोन वेळा लाभ दिलेला असून, तपासणीवेळी प्रत्यक्षात एकच अवजार दिसून आले.

- दोन ठिकाणी एकही अवजार नव्हते

- अधिकाऱ्यांनीही जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा संशय

अकोला जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत वाटप झालेल्या यंत्र, अवजारांची तपासणी बुलडाणा जिल्ह्यातील चौकशी समितीने केली होती. त्यांनी वरिष्ठांना अहवाल सादर केलेला आहे. त्याची प्रत या कार्यालयालाही आता मिळाली आहे. त्यानुसार अवजारे, यंत्राबाबत संबंधित गट, शेतकरी कंपन्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागवण्यात येईल. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील विहित कारवाई करण्यात येईल.
- डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प संचालक, आत्मा, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com