Rabbi Sowing : अमरावतीत केवळ ३० टक्‍के क्षेत्रावर रब्बी पेरणी

Rabbi Season : प्रतिकूल वातावरणामुळे यंदा थंडी पडण्यास उशीर झाला. त्याच्या परिणामी रब्बी पेरण्या माघारल्या होत्या. आता मात्र थंडीचा कडाका वाढताच पेरण्यांनाही वेग आला आहे.
Rabbi Sowing
Rabbi Sowing Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : अमरावती ः प्रतिकूल वातावरणामुळे यंदा थंडी पडण्यास उशीर झाला. त्याच्या परिणामी रब्बी पेरण्या माघारल्या होत्या. आता मात्र थंडीचा कडाका वाढताच पेरण्यांनाही वेग आला आहे. सद्यःस्थितीत ४५,३६३ हेक्‍टरवर रबी पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यावर्षी रबी हंगामाला सुरुवात झाली असली तरी पेरण्यांना गती आली नव्हती. रबी पिकांकरिता अपेक्षित थंडी पडत नसल्याने हे घडले होते. गेला महिनाभर थंडीच नसल्याने जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे देखील रब्बी पेरण्या रखडल्या होत्या.

Rabbi Sowing
Rabbi Sowing : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत रब्बी पिकांची १९ हजार हेक्टरवर पेरणी

सोयाबीन, मूग, उडदाचा हंगाम संपल्याने त्या क्षेत्रात आता रब्बी पिकांची लागवड होणार आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी १ लाख ४८ हजार ८७९ हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ४५,३६३ इतक्‍या अत्यल्प क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्याची टक्‍केवारी अवघी ३० असल्याने कृषी विभागाची देखील चिंता वाढली आहे.

पेरणी झालेले सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याखाली असून केवळ ४२९२ हेक्‍टरवरच गव्हाची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुार धारणी तालुक्‍यात १६,८३१, चिखलदरा ४,५९२, अमरावती ७,५४९, भातकुली ८,८७२, नांदगाव खंडेश्‍वर १०,३१९, चांदूररेल्वे ५,३९२, तिवसा १०,४६७, मोर्शी १०,३६१, वरुड ६,३४४, दर्यापूर २१,२१०, अंजनगावसूर्जी ७,५७०, अचलपूर ९,९६१, चांदूरबाजार १२,९५४, धामणगावरेल्वे १६,३७७ हेक्‍टर याप्रमाणे लागवड क्षेत्र प्रस्तावित आहे.

असे आहे हरभरा लागवड

क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

दर्यापूर ः ४७२९

चांदूर बाजार ः ४७६४

अमरावती ः ४७६८

धामणगाव ः ११,९७८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com