Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Mulberry Varieties : रेशीम कीटकांचे एकमेव खाद्य म्हणजे तुतीची पाने. रेशीम उद्योगातील अत्यंत मुख्य घटक म्हणून तुतीची पाने ओळखली जातात. कारण प्रति युनिट क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या पानांच्या गुणवत्तेचा आणि प्रमाणाचा थेट परिणाम कोष उत्पादनावर होतो.
Sericulture
SericultureAgrowon
Published on
Updated on

Silk Farming : रेशीम कीटकांचे एकमेव खाद्य म्हणजे तुतीची पाने. रेशीम उद्योगातील अत्यंत मुख्य घटक म्हणून तुतीची पाने ओळखली जातात. कारण प्रति युनिट क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या पानांच्या गुणवत्तेचा आणि प्रमाणाचा थेट परिणाम कोष उत्पादनावर होतो. त्यासाठी दर्जेदार तुती पाला नियमितपणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे.

महाराष्ट्रासह दक्षिण भारतात रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी तुतीच्या काही महत्त्वाच्या जातींची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने व्हिक्टरी -१ (व्ही १), एस-३६, जी-४, जी-२ आणि एजीबी ८ (AGB८) या सुधारीत जातींची सध्याच्या काळात लागवडीसाठी निवड करता येईल.

एस-३६

  • ही तुती जात प्रामुख्याने बाल्य रेशीम अळी (चॉकी) संगोपनासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

  • या जातीची पाने अत्यंत पौष्टिक असून बाल्य वयाच्या रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी याची शिफारस केली जाते.

  • या जातीचे झाड साधे वळणदार, हिरवट, करड्या रंगाचे असते.

  • पाने चकचकीत, गुळगुळीत पृष्ठभागाची असून, पानांची रचना ही एकमेकासमोर असते. पाने मोठ्या बोटीच्या आकारासारखी दिसतात.

  • मध्यम फांद्या, राखाडी गुलाबी रंगाचे खोड हे या जातीचे वैशिष्ट्य आहे.

  • या जातीच्या तुती लागवडीमधून पाल्याचे खात्रीशीर उत्पादन मिळते. योग्य सिंचन व्यवस्थापन व खत व्यवस्थापन केल्यास प्रति वर्ष प्रति हेक्टरी ४० ते ४२ हजार किलो पाल्याचे उत्पादन मिळते.

  • या जातीच्या झाडांची मुळे फुटण्याचे प्रमाण ४८ टक्के इतके आहे.

Sericulture
Sericulture : धाडस अन् अभ्यासातून रेशीम शेतीत मिळवली मास्टरी

व्हिक्टरी -१

  • ही जात व्ही- १ (V१) या नावाने प्रसिद्ध आहे. ही जात केंद्रीय रेशीम उत्पादन आणि अनुसंधान संस्थान, म्हैसूर यांनी विकसित केली आहे.

  • फांद्या सरळ, मोठ्या सरळ, जाड व रसरशीत पाने आणि राखाडी रंगाचे खोड ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत.

  • पाने जाड, रसाळ, मोठी, संपूर्ण आणि अंडाकृती, गुळगुळीत आणि चमकदार असतात.

  • या जातीची उच्च मुळधारण क्षमता, जलद वाढ आणि जास्त उत्पादन अशी वैशिष्ट्ये आहेत.

  • प्रौढ रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी ही तुतीची जात अत्यंत योग्य आहे.

  • महाराष्ट्रामध्ये रेशीम उत्पादकांमध्ये ही अत्यंत लोकप्रिय असलेली जात असून लागवडही मोठ्या क्षेत्रावर आहे.

एजीबी ८ (AGB८)

  • ही संकरित जात आहे.

  • ही जात विशेषतः अर्ध-शुष्क प्रदेशात जेथे जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणी लागवडीसाठी विकसित केलेली आहे.

  • या जातीच्या लागवडीपासून हेक्टरी प्रति वर्ष सुमारे ४७ मेट्रिक टन पानांचे उत्पादन मिळते.

  • रेशीम कीटक संगोपनासाठी या जातीच्या पाने अत्यंत दर्जेदार आणि उत्तम आहेत.

  • ताठ शाखा, जाड गडद-हिरवी कडक पाने, मध्यम इंटर-नोडल अंतर आणि त्यात उच्च मूळ धारण क्षमता ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत.

फायदे ः

ओलिताखालील क्षेत्रात लागवडीसाठी योग्य.

उत्तम मूळधारण क्षमता आणि कटिंग्जद्वारे लागवड शक्य.

जलद पुनरुत्पादन तसेच वाढण्याची क्षमता.

पानांवर येणाऱ्या रोगांना सहनशील.

Sericulture
Sericulture : राज्यात रेशीम शेती वाढविण्यासाठी प्रचंड वाव

जी-२

  • ही उच्च उत्पादन देणारी तुतीची जात आहे.

  • या जातीची शिफारस चॉकी बागेसाठी करण्यात आली आहे.

  • या जातीपासून सुमारे ३८ मेट्रिक टन प्रति हेक्टर प्रति वर्ष इतके तुती पानांचे उत्पादन मिळते.

  • या जातीच्या झाडांच्या फांद्या ताठ, पाने जाड गडद-हिरवी असतात.

  • बाल्य रेशीम अळ्या (चॉकी) संगोपनासाठी ही फायदेशीर तुती जात आहे.

  • या जातीपासून एस ३६ पेक्षा ३३ टक्के, तर व्ही १ पेक्षा २० टक्के अधिक जास्त पानांचे उत्पादन मिळते.

जी-४

  • ही उच्च उत्पादन देणारी तुतीची सुधारित जात आहे.

  • प्रौढ वयाच्या रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी ही तुती जात योग्य आहे.

  • या जातीच्या पानांचे उत्पादन सुमारे ६५ मेट्रिक टन प्रति हेक्टर प्रति वर्ष इतके मिळते.

  • ही जात केंद्रीय रेशीम उत्पादन आणि अनुसंधान संस्थान, म्हैसूर यांनी विकसित केली आहे.

  • या जातीच्या तुतीची पाने जाड गडद-हिरवी, दर्जेदार, चकचकीत आणि गुळगुळीत असतात.

  • ताठ फांद्या, लहान इंटर-नोडल अंतर ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत.

फायदे ः

  • प्रौढ वयाच्या बायव्होल्टाइन रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी योग्य तुती जात आहे.

  • ही उच्च मूळधारण क्षमता असलेली तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असलेली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com