Soybean Purchase Target : सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्ट

Procurement Goals : राज्यातील शासकीय सोयाबीन खरेदी नव्या मुदतवाढीमुळे पुन्हा सुरू झाली. यासोबतच राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्टसुद्धा देण्यात आले आहे.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Akola News : राज्यातील शासकीय सोयाबीन खरेदी नव्या मुदतवाढीमुळे पुन्हा सुरू झाली. यासोबतच राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्टसुद्धा देण्यात आले आहे. राज्यात १४ लाख १३ हजार टन खरेदीचे निर्धारित उद्दिष्ट असून जिल्ह्यांच्या उद्दिष्टांमध्ये नव्याने सुधारणा करण्यात आली आहे.

नव्या निर्देशानुसार सोयाबीन खरेदीचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले आहे. यानुसार अकोला जिल्ह्याला पहिल्या टप्प्‍यात चार लाख ६५ हजार ८०० क्विंटलचे उद्दिष्ट होते. ते आता सुमारे दोन लाख क्विंटलने वाढवत सहा लाख ५८ हजार २१०० क्विंटल झाले आहे. लातूरचे उद्दिष्ट ८ लाख ३८ हजारांवरून ११ लाख ८४ हजार इतकी झाली आहे. बुलडाणा या जिल्ह्याला ९ लाख १९४ क्विंटलवरून १२ लाख ७४ हजार, वाशीमला सहा लाख ८२ हजारांवरून ९ लाख ६३ हजार ८२० क्विंटल एवढी नवी मर्यादा मिळाली आहे.

Soybean
Soybean Procurement : सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची हेळसांड

राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक जिल्हे मिळून सुमारे १० लाख टनांचे उद्दिष्ट होते. ते आता १४ लाख १३ हजार २७० टन एवढे करण्यात आले आहे. जिल्ह्यांना दिलेल्या सुधारित लक्ष्यांकानुसार सोयाबीन उत्पादक प्रमुख जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची मुभा मिळाली आहे. शिवाय पहिल्या टप्प्याच्या लक्ष्यांकानुसार खरेदी उद्दिष्ट पूर्ण केलेल्यांना आता अधिक खरेदीला संधीसुद्धा मिळत आहे.

Soybean
Soybean Procurement : सोयाबीन खरेदीसाठी कायस्वरुपी यंत्रणा उभारा

सोयाबीन खरेदीला आला वेग

यंदाच्या हंगामात सोयाबीनला हमीभाव ४८९२ रुपये आहे. मात्र बाजारपेठांमध्ये त्यापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे ओढा तयार झाला आहे. शासनाने खरेदी सुरू केल्यानंतर सुरुवातीला सोयाबीनमधील ओलाव्यामुळे खरेदी रखडली होती. नंतर मध्यंतरी बारदाना नसल्यानेही केंद्र बंद राहिले. त्यातच १२ जानेवारीला मुदत संपल्याने नवे आदेश यायला दोन दिवस गेले. आता ३१ जानेवारीची सुधारित मुदत देण्यात आली आहे.

ओलावा नसल्याने खरेदीचा वेग वाढला

सोयाबीनमध्ये ओलावा नसल्याने खरेदीचा वेग वाढला. खरेदी केलेला माल शासनाच्या गोदामांमध्ये साठवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने पर्यायी व्यवस्थासुद्धा करावी लागते आहे. आता शिल्लक उरलेल्या १५ दिवसांत नेमकी किती खरेदी होईल, याबाबत पुढील काळातच चित्र स्पष्ट होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com