Swachh Survekshan 2024 : देवळा नगरपंचायत राज्यात ४५ व्या क्रमांकावर

Swachh Bharat Abhiyan : देवळा शहराची वीस हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात आज कामगिरी करून देवळा नगरपंचायतीने देशात २०३० पैकी ११८ वा तर राज्यात १६१ पैकी ४५ वा क्रमांक मिळविला.
Swachh Survekshan 2025
Swachh Survekshan 2025Agrowon
Published on
Updated on

Nashik News : स्वच्छ भारत मिशन नागरी २.० मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देशात ११८ वा तर राज्यात ४५ वा क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिली.

देवळा शहराची वीस हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात आज कामगिरी करून देवळा नगरपंचायतीने देशात २०३० पैकी ११८ वा तर राज्यात १६१ पैकी ४५ वा क्रमांक मिळविला. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरोघरी कचरा संकलन, कचरा विलगीकरण, कचरा प्रक्रिया, कचरा तक्रारींचे निवरण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, व्यावसायिक रहिवासी व मार्केट क्षेत्र स्वच्छता, जलस्त्रोत व सार्वजनिक शौचालय स्वच्छता तसेच स्वच्छता ही सेवा, ब्लॅक स्पॉट सुशोभीकरण आदी बाबींच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यात आले.

Swachh Survekshan 2025
Swachh Bharat Abhiyan : ‘स्वच्छ भारत’ जागृतीमुळे गावे ओडीएफ प्लस

हागणदारीमुक्त शहर मानांकनामधील ओडीएफ प्लसप्लस मानांकन प्राप्त झाले. कचरामुक्त शहर स्टार रेटिंग मानांकनामध्ये देवळा शहराला एक स्टार मानांकन मिळाले आहे. देवळा शहराचा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आजअखेरची उच्चतम कामगिरी केली असून देशात ४८७ वरून ११८ व्या क्रमांकावर तर राज्यात ९६ वरून ४५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

Swachh Survekshan 2025
Swachh Gram Award : स्वच्छ ग्राम स्पर्धेत घुईखेडची बाजी

या उच्चतम कामगिरीमध्ये मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष संजय आहेर व सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभाग प्रमुख अजय बच्छाव, शहर समन्वयक दिग्विजय देवरे, स्वच्छता मुकादम सतीश साळुंके, संगीता सोनगत व सर्व सफाई कामगार यांनी मोलाचे योगदान दिले.

नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकून नये तसेच कचरा हा ओला व सुका वर्गीकृत करूनच द्यावा व प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळत पर्यावरणाचे संरक्षण करावे आणि ‘स्वच्छ देवळा-सुंदर देवळा’ यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.
- भाग्यश्री पवार, नगराध्यक्षा, देवळा नगरपंचायत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com