Swachh Gram Award : स्वच्छ ग्राम स्पर्धेत घुईखेडची बाजी

Gram Sawachhata Abhiyan : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत तालुकास्तरावर सर्वांत जास्त गुण प्राप्त केलेल्या नऊ ग्रामपंचायतींची पडताळणी जिल्हास्तरीय समितीने केली. त्याचा निकाल घोषित करण्यात आला.
Gram Swachhata Abhiyan
Swachh Bharat MissionAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत तालुकास्तरावर सर्वांत जास्त गुण प्राप्त केलेल्या नऊ ग्रामपंचायतींची पडताळणी जिल्हास्तरीय समितीने केली.

त्याचा निकाल घोषित करण्यात आला. त्यामध्ये घुईखेड ग्रामपंचायतीने (चांदूर रेल्वे) प्रथम स्थान प्राप्त केले. तसेच ग्रामपंचायत वाघडोहने (अचलपूर) द्वितीय, तर ग्रामपंचायत मालखेडने (वरुड) तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात १ मे २०२४ पासून होते. सदर अभियानामध्ये पाणी गुणवत्ता, पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन, लोकसहभाग याविषयांशी निगडित बाबींच्या अनुषंगाने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड होते. याकरिता ग्रामपंचायतींना २०० प्रश्नांच्या पडताळणीमध्ये गुण प्राप्त करावे लागतात.

Gram Swachhata Abhiyan
Gram Swachhata Abhiyan : श्रीरामपूर, बामखेड्यात विभागीय समितीकडून पाहणी

सर्वप्रथम जिल्हा परिषद गटस्तरावर गटातील सर्व ग्रामपंचायतींची पडताळणी करण्यात येते, त्यानंतर त्यामधील उत्कृष्ट दोन ग्रामपंचायतींची पडताळणी गटविकास अधिकारी स्तरावरील समितीमार्फत करण्यात येते.

जिल्हास्तरावर सर्व तालुक्यांतून आलेल्या गुणपत्रिकेनुसार सर्वांत जास्त गुण प्राप्त करणाऱ्या पहिल्या नऊ ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय पडताळणीकरिता निवड करण्यात येते. यामधून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पडताळणी समितीने घोषित केलेल्या निकालामध्ये ग्रामपंचायत घुईखेड प्रथम, वाघडोह द्वितीय तर मालखेडने तिसरे स्थान प्राप्त केले.

Gram Swachhata Abhiyan
Gram Swachhata Abhiyan : ग्रामस्वच्छता अभियानात शिरापूर, मांडवे गावांना पुरस्कार

घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापनाचा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार ग्रामपंचायत गोविंदपूर (चांदूरबाजार), पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रामपंचायत निमखेड बाजार, तर शौचालय व्यवस्थापनाचा स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार ग्रामपंचायत हरताळा (भातकुली) ग्रामपंचायतला देण्यात आला आहे.

विभागस्तरीय पडताळणी पूर्ण

जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या घुईखेड व द्वितीय ठरलेल्या वाघडोह ग्रामपंचायतची विभागस्तरीय पडताळणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात आली आहे. विभागस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराची रक्कम अनुक्रमे १२ लाख, नऊ लाख व सात लाख एवढी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com