Rabi Crop Management : रब्बी पिकांमध्ये कोळपणी, संरक्षित सिंचन महत्त्वाचे

Irrigation Management : करडई,ज्वारी आणि हरभरा पिकांमध्ये कोळपणी करावी. वाढीच्या टप्प्यात पिकाला संरक्षित पाणी द्यावे.
Crop Management
Crop Management Agrowon
Published on
Updated on

Crop Management : करडई,ज्वारी आणि हरभरा पिकांमध्ये कोळपणी करावी. वाढीच्या टप्प्यात पिकाला संरक्षित पाणी द्यावे. ऊस पिकाला पाटपाणी पद्धतीने सिंचन करताना एकआड एक सरीतून द्यावे.

पाण्याच्या ताण पडत असल्यास उभ्या पिकातील खालची पक्व झालेली, तसेच वाळलेली पाने काढून आच्छादन म्हणून सरीत पसरावीत, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

रब्बी ज्वारी ः

- पीक उगवणीनंतर ८-१० दिवसांनी पहिली विरळणी करावी. त्यानंतर ८-१० दिवसांनी दुसरी विरळणी करून हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवावी. हेक्टरी १.२० ते १.३५ लाख झाडे.

- कोरडवाहू ज्वारीस पेरणीनंतर ३, ५ व ८ आठवड्यांनी एकूण तीन कोळपण्या कराव्यात. आवश्यकतेनुसार १ ते २ निंदण्या कराव्यात. म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडणार नाहीत आणि जमिनीवर ओलावा टिकून राहील. तणांचा बंदोबस्त होईल.

- रब्बी हंगामात जमिनीतील जवळवास ६० ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे कमी होतो. जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकविण्यासाठी शेतातील काढलेले तण, पालापाचोळा, गव्हाची काडे, तूर काटके इ.चा वापर ज्वारी पेरल्यापासून ५० दिवसांच्या आत आच्छादन म्हणून करावा.

-शक्य झाल्यास कमकुवत झाडे काढावीत.

- संरक्षित पाणी व्यवस्थापन करावे. एकाच पाण्याची सोय असल्यास पीक ३५-४० दिवासांचे असताना किंवा पीक पोटऱ्यात असताना पाणी द्यावे.

-पाणी मोकाट पद्धतीने न देता पट्टा पद्धतीने द्यावे.

Crop Management
Rabi Jowar : रब्बी ज्वारीत एक कोळपणी महत्त्वाची

करडई

-पीक उगवणीनंतर २५-३० दिवसांनी विरळणी करून दोन रोपांतील अंतर २० सें.मी. ठेवावे.

- पीक उगवणीनंतर २५ - ३० आणि ४५-५० दिवसांनी दोन निंदण्या व कोळपण्या कराव्यात.

- पाणी सोड ओळ पद्धतीने किंवा रुंद वरंबा पद्धतीद्वारे द्यावे.

- सोड ओळ पद्धतीने पिकाच्या दोन ओळींनंतर एक ओळ पेरणी न करता सोडून द्यावी. सोडलेल्या ओळीतून सरी पाडून त्या सरीने पिकास पाणी द्यावे.

-सुरुवातीच्या अवस्थेत तुषार सिंचनाचा वापर करावा.

- पिकाच्या संवेदनशील अवस्थेत (पीक फुलावर येते वेळेस व बोंडात करडई भरण्याची) पाणी द्यावे.

Crop Management
Wheat Varieties : उशीरा पेरणीसाठी कमी पाण्यात येणारे गव्हाचे वाण

गहू

- गव्हाची एकेरी पेरणी करावी.

- वेळेवर आंतरमशागत करावी. त्यामुळे तणाचा नायनाट होईल. तसेच ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

- पेरणीनंतर ३०-४० दिवसांच्या आत गरजेप्रमाणे १-२ वेळा खुरपणी करावी.

- आच्छादनाचा वापर करावा.

- कमी प्रमाणात ओलिताची सोय असेल तर पाण्याच्या पाळ्याचे खालील प्रमाणे नियोजन करावे.

अ.क्र. --- ओलिताची उपलब्धता --- पाण्याची पाळी देण्याची वेळ (पेरणीनंतरचे दिवस)

१. --- एक ओलितची सोय --- ४२

२. --- दोन ओलितची सोय --- २१, ६५

३. --- तीन ओलितची सोय --- २१, ४२, ६५

- पाणी देण्यासाठी पिकास तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.

हरभरा

-तीन आठवड्यांच्या आत पिकास एक कोळपणी व खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.

-जिरायती क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूप कमी असतो. एखादे पाणी देणे शक्य असल्यास पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.

- जिरायती हरभऱ्यासाठी पीक फुलावर येण्यापूर्वी एक टक्का पोटॅशिअम नायट्रेट किंवा दोन टक्के युरियाची फवारणी करावी. त्यानंतर दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी.

-तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.

डॉ. एस. बी. पवार, ९४२२१७८९८२

(सहयोगी संचालक संशोधन आणि विस्तार कृषी विद्यावेत्ता, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छ. संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com