Rabbi Jowar : रब्बी हंगामासाठी निवडा ज्वारीचे हे वाण

Rabbi Season : रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांकडे एक ते दोन संरक्षित पाण्याची सुविधा आहे असे शेतकरी हमखास रब्बी ज्वारीची पेरणी करतात. ज्वारीसोबतच कडबाही शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देतो.
Rabbi Jowar Variety
Rabbi Jowar VarietyAgrowon
Published on
Updated on

PKV Kranti Variety : रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांकडे एक ते दोन संरक्षित पाण्याची सुविधा आहे असे शेतकरी हमखास रब्बी ज्वारीची पेरणी करतात. ज्वारीसोबतच कडबाही शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देतो.  पण रब्बी ज्वारीचे उत्पादन खरीप ज्वारीच्या तुलनेत कमी येत.

याच मुख्य कारण म्हणजे खरीप हंगामात अनेक संकरित व शुद्ध वाण उपलब्ध आहेत तर रब्बी हंगामासाठी मोजकेच वाण उपलब्ध आहेत. ही गरज लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राने विकसीत केलेले रब्बी ज्वारीचे  पीकेव्ही क्रांती म्हणजेच एके एस व्ही १३ आर हे वाण फायदेशीर ठरले आहे. हे वाण फायदेशिर कस आहे याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत. 

रब्बी ज्वारीपासून मिळणारे चांगले प्रतीचे धान्य जनावरांसाठी चांगला प्रतिचा चारा व धान्याला मिळणारा चांगला बाजारभाव या सर्व बाबी लक्षात घेऊन रब्बी ज्वारीचे पीक फायदेशीर मानले जाते.  रब्बी हंगामात जास्त उत्पादन देणारे मालदांडी - ३५ - १  या वाणाला पर्याय म्हणून पीकेव्ही क्रांती म्हणजेच एके एस व्ही १३ आर हे सरळ व शुद्ध वाण  २००४ - २००५  या वर्षी राज्य पातळीवर प्रसारित झालेले आहे. हे वाण इतर गुणामध्येही मालदांडी-३५-१ या वाणा च्या तोडीस तोड आहे.

Rabbi Jowar Variety
Rabbi Jowar Variety : कोरडवाहू, बागायतीसाठी रब्बी ज्वारीचे वाण

पीकेव्ही क्रांती वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत?

हे वाण मध्यम कालावधीत तयार होणारे आहे. या वाणाचे कणीस आकाराने मोठे, दाणे मोत्यासारखे चमकदार ठोकळ आहेत. हे वाण मध्यम ते भारी जमिनी करिता फायदेशिर मानले जाते. या वाणापासून धान्याचे उत्पादन हेक्टरी २५ ते ३० क्विंटल तर कडब्याचे उत्पादन हेक्टरी ७० ते ७५ क्विंटल मिळते. ज्वारीच्या इतर वाणांच्या तुलनेत भाकरीची प्रत अतिशय उत्तम असून इतर गुणधर्मांमध्ये सुद्धा हे वाण मालदांडी - ३५ - १ या वाणासारखेच आहे.

सध्या रब्बी ज्वारीचे उपलब्ध वाण आहेत त्या वाणांपैकी हे वाण जास्त उत्पादन क्षमता असणारे तसच चांगल्या प्रतीचे धान्य व कडब्याच्या उत्पादनासाठी झपाट्याने लोकप्रिय होत आहे.  हे वाण मध्यम कालावधीत म्हणजेच १२० ते १२२ दिवसात तयार होत.  ज्वारीच्या मालदांडी ३५ - १ या वाणापेक्षा धान्याचे उत्पादन २० टक्क्यांनी तर कडब्याचे उत्पादन २९ टक्क्यांनी जास्त आहे.  हे वाण खोडकीड, खोडमाशी व कडा करपा या  कीड, रोगासाठी बऱ्याच प्रमाणात प्रतिकारक आहे. याशिवाय उत्पादनासाठी सोपे आणि दरवर्षी या वाणाचे बियाणे वापरता येते आणि मळणीही जास्त सोप्या पद्धतीने करता येते. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामासाठी या वाणाचा विचार नक्की करा. 

-------------

माहिती आणि संशोधन - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com