Team Agrowon
रब्बी हंगामात कोळपणीचा फार मोठ सहभाग आहे. एकदा कोळपणी केली तर एक पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो.
कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारीकरिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.
पहिली कोळपणी पीक तीन आठवड्याचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे वाढणारे तण नष्ट करून त्यावाटे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.
दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्यांचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी.त्या वेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात. त्या कोळपणीमुळे बंद होतात.
तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्याचे झाले असताना करावी.त्या वेळी कोळपणी करण्यासाठी दातेरी कोळपे वापरण्याची शिफारस आहे.
जमिनीत ओल फार कमी असेल त्यावेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.