Krushi Vasant Abhiyan
Krushi Vasant AbhiyanAgrowon

Krushi Vasant Abhiyan : ‘कृषी वसंत’ अभियानाला अकोला जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू

Kharif Season : खरीप हंगामात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ‘कृषी वसंत’ हे अभियान कृषी विभाग, ग्रामविकास विभाग व महसूल विभागाच्या समन्वयाने राबविले जात आहे.

Akola News : खरीप हंगामात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ‘कृषी वसंत’ हे अभियान कृषी विभाग, ग्रामविकास विभाग व महसूल विभागाच्या समन्वयाने राबविले जात आहे.

घरगुती बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम राबवणे, बीबीएफवर सोयाबीन पिकाच्या पेरणीबाबत मार्गदर्शन करणे हा मुख्य हेतू आहे.

Krushi Vasant Abhiyan
Pre Monsoon Rain : वळवाच्या पावसाची अनेक ठिकाणी हजेरी

त्यानुसार कामकाज सुरू झाले असून मंगळवारी (ता.१४) जिल्हाधिकारी श्री. कुंभार, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी पातूर तालुक्यातील मौजे देऊळगाव येथे बियाणे उगवणशक्ती तपासण्याचे प्रात्यक्षिक घेतले.

Krushi Vasant Abhiyan
Agriculture Advisory : कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मौजे तांदळी बुद्रुक येथे खोदलेल्या सिंचन विहिरीची बी. वैष्णवी यांनी पाहणी केली.

या वेळी पातूर तहसीलदार राहुल वानखडे, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे, गट विकास अधिकारी अगर्ते यांच्यासह कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com