Agriculture Input Act : दबावाला बळी न पडता प्रस्तावित कृषी निविष्ठा कायदे अंमलात आणा

Agriculture Department : शेतकऱ्यांना विकलेल्या कृषीनिविष्ठा निकृष्ट दर्जाच्या निघाल्यास शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी राज्य शासनाकडून कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांच्यासाठी प्रस्तावित कायदा आणला जात आहे.
Agriculture Law
Agriculture LawAgrowon
Published on
Updated on

Nashik News : शेतकऱ्यांना विकलेल्या कृषीनिविष्ठा निकृष्ट दर्जाच्या निघाल्यास शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी राज्य शासनाकडून कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांच्यासाठी प्रस्तावित कायदा आणला जात आहे. मात्र हे प्रस्तावित केलेले कायदे मागे घ्यावेत,

यासाठी काही संघटनांकडून शासनावर दबाव टाकण्यात येत आहे. सरकारने या दबावाला बळी न पडता प्रस्तावित कायद्यांत सुधारणा करून कायदे अंमलात आणावेत, अशी मागणी (कै.) शरद जोशी प्रणित जिल्हा शेतकरी संघटनेने केली.

Agriculture Law
Crop Insurance : विमा कंपन्यांनी थकवले ८३१ कोटी

याबाबत मुख्यमंत्री, कृषिमंत्री यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. खते, बियाणे किंवा कीटकनाशके निकृष्ट, कमी प्रत, बनावट किंवा पिकांना नुकसानकारक असतील, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तरी त्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असणारा कोणताही कायदा सध्या अस्तित्वात नाही.

राज्य शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर वचक असावा व त्यांना कठोर शासन व्हावे, यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी व फसवणूक झाल्यास नुकसानभरपाई मिळण्यासाठी अशा कायद्यांची गरज आहे.

Agriculture Law
Agriculture GI : महाराष्ट्रातील नऊ उत्पादनांना ‘जीआय’

कृषीनिविष्ठा कायद्यांबद्दल कृषी सेवा केंद्र मालक, वितरक, उत्पादक कंपन्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत व त्यामुळे त्यांच्याकडून व इतर काही संघटनांकडून कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहे, असे शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

हप्ते वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची तरतूद असावी

खते, बियाणे, कीटकनाशकांबरोबर पीसीआर (संप्रेरके) व तणनाशकांचाही या कायद्यात समावेश करावा. या बाबींमध्ये तक्रार करण्यासाठी ४८ तासांची मुदत आहे, ती वाढवून आठ दिवस करण्यात यावी. कंपनी, दुकानदार किंवा स्टॉकिस्ट यांच्याकडून हप्ते वसूल करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाईची तरतूद असावी.

जाणीवपूर्वक वारंवार खोटी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवरही कारवाई किंवा दंड करावयाची कायद्यात तरतूद असावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. मागणीच्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, निफाड तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोंबले, भानुदास ढिकले, लुखा बोराडे, केदू बोराडे, नामदेव बोराडे, सोपान संधान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com