Solar Energy : ऊर्जेचा सदुपयोग होण्यासाठी नवीन संकल्पना अमलात आणा

Solar Power : भारतात मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश पडतो. सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते.
Solar Energy
Solar EnergyAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘भारतात मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश पडतो. सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. याऊर्जेचा सदुपयोग होण्यासाठी नवीन संकल्पना अमलात आणण्याची गरज आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यावर भर देत आहे,’’ असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या ‘वाणी’ योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या ‘द्वितीय राष्ट्रीय परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी ‘शाश्वत विकासासाठी ऊर्जा आणि पर्यावरण’ या विषयावर डॉ. काकडे बोलत होते.

Solar Energy
Solar Energy : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज : उपमुख्यमंत्री फडणवीस

अध्यक्षस्थानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे होते. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, सी-ग्रीन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन माटे, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल, परिषदेचे संघटन सचिव डॉ.चंद्रशेखर सेवतकर उपस्थित होते.

डॉ.काकडे म्हणाले, की सौरऊर्जेचा वापर प्रभावी वापर कृषी क्षेत्रात करण्याची गरज आहे. यासाठी विविध प्रयोग यशस्वी झाले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसेच येणाऱ्या काळात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पूर्णपणे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. तसेच त्यांचे कौशल्य उंचावेल. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

Solar Energy
Solar Energy : प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जा

डॉ. पानगव्हाणे म्हणाले, की भारतातील शेकडो महाविद्यालयांनी पाठवलेल्या प्रस्तावातून राष्‍ट्रीय परिषदेसाठी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रस्तावाची निवड शिक्षण परिषदेने केली. विशेष म्हणजे या परिषदेचे सर्व कामकाज मराठी भाषेत करण्यात आले. परिषदेला जास्तीत जास्त संशोधक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी व विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे.

संशोधकांनी २५ शोधनिबंध सादर केले. डॉ.महेश शिंदीकर, अजित गाडगीळ, मेधा ताडपत्रीकर, अँड.राहुल पडवळ यांनी शोध निबंधाबाबत मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाने २५ किलोमीटर परिघात काय समस्या आहेत. याचे अवलोकन करून त्या सोडवण्यावर भर द्यावा. त्यामुळे अभियांत्रिकीमध्ये पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या समाजातील व स्वभोवतालच्या समस्या सोडण्याची संधी मिळेल. पर्यायी व पर्यावरण पूरक संसाधनाच्या वापरावर भर देणे शक्य होईल.
- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
सौरऊर्जा, बायोमास, बायोमिथिनेशन, बायोचार व खत निर्मिती या पद्धतीद्वारे सौर ऊर्जा निर्मितीवर भर द्यावा. स्वयंपूर्ण गावे होण्यासाठी लहान व दुर्गम ठिकाणी ऊर्जा ट्रॅफिक स्रोताचा आग्रह धरावा."
- डॉ नितीन माटे, सी-ग्रीन व्यवस्थापकीय संचालक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com