Solar Energy : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज : उपमुख्यमंत्री फडणवीस

Deputy Chief Minister Devendra Fadnavis : राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळेल. तसेच मागेल त्याला कृषी पंप दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Solar Energy
Solar EnergyAgrowon

Pune News : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतीपिकांच्या नुकसानीसह शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने'तंर्गत 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजना सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी (ता.०७) यांनी माहिती देताना, मागेल त्याला सौर कृषी पंप आणि शेतीसाठी दिवसा वीज देण्यात येईल असे सांगितले आहे. तसेच त्यांनी यासाठी राज्यात महत्वपुर्ण योजना आखल्याचे सांगितले. 

शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीचा वीज पुरवठा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागते. तर रात्रीचे शेतात गेल्याने अथवा जाताना-येताना वन्य प्राण्यांचा धोका पत्करावा लागतो. यात अनेकांना अपंगत्व आणि जीव देखील गमवावा लागला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडून शेतीसाठी रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी केली जात होती. 

यादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, मागेल शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ९ हजार मेगा वॅटच्या कामाचे देकार पत्र जारी करण्यात आल्याची माहिती दिली आहेत. तसेच या योजनेसाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहीनी योजना २.० अंतर्गत ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून राज्यात २५००० रोजगार निर्मिती होईल. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप देण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 

Solar Energy
Solar Energy : बुलडाण्यात २ हजार ग्राहक झाले वीज निर्माते

पुढे फडणवीस म्हणाले, राज्यात सौर ऊर्जेद्वारे कृषी पंप चालविण्याची योजना २०१६ मध्ये हाती घेण्यात आली होती. त्याप्रमाणे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राळेगण सिद्धी येथे सौर ऊर्जा पंप बसविण्यात आला होता. येथे २००० मेगा वॅट सौर ऊर्जा तयार झाली होती. पण आता शेतकऱ्यांना दिवसादेखील पुरेसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कुषी वाहीनी योजनेचा पुढचा ठप्पा २.० सुरु करण्यात आला आहे. यासाठी हुडको सोबत करार करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. 

तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ९ हजार मेगा वॅटच्या कामाचे देकार पत्र जारी केले आहेत. यासाठी ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून हे काम १८ महिन्यात पूर्ण करायचा आहे. तर सोबत काम करून तो १५ महिन्यात पुर्ण होईल असा विश्वास, फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

Solar Energy
Solar Energy : नागपूरला सौर जिल्हा करण्यासाठी महावितरणचा पुढाकार

शेतकऱ्यांना मिळणार वीज

राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज ही सरकारला ७ रूपयांनी घ्यावी लागत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर त्याचा थेट परिणाम होत होता. मात्र आता या योजनेमुळे शेतकऱ्यांना वीज थेट मिळणार असून त्यांना १.२५ लाख रूपये प्रति हेक्टर प्रमाणे वार्षिक भाडे मिळेल. 

शेतकऱ्यांना मिळणार ८ लाख सौर ऊर्जा पंप 

यावेळी फडणवीस यांनी मागेल त्याला पंप अशी घोषणा करताना आता ज्यांनी मागणी केली आहे. अशा शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप दिले जाणार असून शेतकऱ्यांना ८ लाख सौर ऊर्जा पंप देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच शुक्रवार (ता.०८) पासूनच उर्वरित कृषि फिडर हे सौर ऊर्जेवर घेण्यासाठी काय नियोजन करता येईल ते पहा,  थांबू नका असे आदेश फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

रोजगार निर्मिती

राज्यातील शेतकऱ्यांच्या दिवसा वीज पुरवठा या मागणीला लक्षात घेता मुख्यमंत्री सौर कृषि वाहीनी योजनेतंर्गत २.० योजना आखण्यात येणार आहे. यातून वीजेचा प्रश्न मार्गी लागणारच आहे. याचबरोबर या योजनेत तब्बत ४० हजार कोटीची गुंतवणूक होणार असल्याने २५ हजार रोजगार निर्मिती होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com