Solar Energy : प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जा

Solar Electricity : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली आहे.
Solar Project
Solar ProjectAgrowon
Published on
Updated on

Nagar News : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली आहे. यासाठी गावांची निवड केलेली असून निवडलेल्या गावांना येत्या दोन महिन्यांत सौरउर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या गावात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना ३ किलोवॉटपर्यंत ७८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल. पाणीपुरवठा, दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध केले जातील. या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरण आवाहन करणार आहे.

Solar Project
Agriculture Solar Energy : शेतीच्या दिवसा वीजपुरवठ्यासाठी सौर ऊर्जेत होणार वाढ; पश्चिम महाराष्ट्रात प्रकल्प

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निवासी घरगुती ग्राहकांसाठी प्रति किलोवॉट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॉटपर्यंत मिळते. तीन किलोवॉटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॉट क्षमतेसाठी १८ हजार अनुदान मिळते. तीन किलोवॉटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजारपर्यंत मर्यादित आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आदर्शगाव माणन्याचीवाडी ह्या गावाला लवकरच शंभर टक्के सौर उर्जेद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येणार असून हे गाव लवकरच सौरग्राम म्हणून नावलौकीकाला येणार आहे.

Solar Project
Solar Electricity : सांगलीतील झुरेवाडी, निमसोडला सौरऊर्जेद्वारे १०० टक्के वीजपुरवठा

महावितरणद्वारे शंभर टक्के

सौरउर्जेसाठी निवडलेली गावे

कोनांबे, दारणा सांगवी (नाशिक मंडळ), वाके, निंबोळा (मालेगाव मंडळ), पारेगाव, हिवरे बाजार (नगर), पातोडा, दारेगाव (जालना), नानदी, आनंदवाडी (बीड), नवीन आदर्श कॉलनी, मयूरबन सोसायटी (लातूर), सुलदळी गोरे, दातेगाव (हिंगोली), हाडोळी, दवणगीर (नांदेड), आंबेटाकळी, मुरूमखेडा (परभणी), पेण पाडवी पठार, वडवल (पेन मंड ), नेरेपाडा गाव, सिवानसाई गाव (वाशीमंडळ), कलगाव, नाथे (धुळे), निंबोल, पातोंडी (जळगाव), मोहिदा, ब्राहमणपुरी (नंदुरबार), शिरवली कुंभारली, गोलभान, मोहोप (कल्याण मंडळ),

अक्करपट्टी, कोलगाव (पारघर), शिवनेरी, निर्वाण (वसंई मंडळ), फुरुस, असूर्डे (रत्नागिरी), सौंदाळा, सांगलुड (अकोला), बजरंग नगर-सागवान एरिया, सावजी लेआउट, सुताळा खुर्द (बुलढाणा), झकलवाडी, पारवा (वाशीम), नवाथे, काठोरा (अमरावती), सोमनाथ, आनंदवन (चंद्रपुर), कोंढाणा तुंबडी मेंढा (गडचिरोली), भोसा, दहेगाव (भंडारा), चिखली, सिंधी, किरमिती भारकस, कॉस्मोपॉलिटन (नागपुर), गझरी, नेरी मिर्जापुर (वर्धा), वांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव (बारामती मंडळ), मान्याची वाडी (सातारा), चिंचणी, औज (सोलापुर), शेळकेवाडी, पिराचीवाडी (कोल्हापुर), झुरेवाडी निमसोड (सांगली), शिवतीर्थ नगर, सेक्टर २५ निगडी (गणेशखिंड मंडळ),

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com