Sugar Factories
Sugar Factoriesagrowon

Sugar Factories : 'साखर कारखान्यांतील इलेक्ट्रॉनिक वजनकाटे तपासणीत गैरव्यवहार'

Kolhapur Sugarcane : केवळ पावणेदोन तासांमध्ये एका साखर कारखान्याचे सात वजनकाटे तपासलेच कसे? असा सवालही संभाजी ब्रिगेडने केला आहे.

Electronic Weighing Scales in Sugar Factory : साखर कारखान्यातील इलेक्ट्रॉनिक वजनकाटे तपासणी प्रक्रियेत संगनमताने सर्वांनी गैरव्यवहार केला आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्याकडे केली.

याबाबत काही पुरावेही सादर केले. याची दखल घेऊन मावळे यांनी कारवाईचा अधिकार मला नाही, याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आश्‍वासन दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रूपेश पाटील यांनी केले.

राज्यातील साखर कारखान्यांकडून होत असलेल्या वजन काट्यांचा गैरवापर उघड करून दक्षता घ्यावी, यासाठी साखर आयुक्त यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि नियंत्रक वैद्यमापन शास्त्र यांच्याकडे प्रस्ताव सादर करून एसओपी (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) मानक कार्यपद्धती घेतली.

भरारी पथकांमार्फत साखर कारखान्यांतील ऊस वजन काट्यांची तपासणी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी करावी, असे असले तरीही हंगाम संपताना तपासणीची मोहीम वैधमापनशास्त्र विभागाकडून केल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. आठ दिवसांत कारवाई संदर्भात सुरुवात न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला.

Sugar Factories
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस ओसरला, एका दिवसात २३ बंधारे मोकळे, अनेक मार्गावरील वाहतूक सुरळीत

शिष्टमंडळात अभिजित कांजर, राहुल पाटील, भीमराव पाटील, नागनाथ बेनके, दत्ता मेटील, सरदार पाटील, संभाजी साळोखे, शहाजी पाटील, लहू बरगे, आसीफ स्वार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सात वजनकाटे तपासलेच कसे?

केवळ पावणेदोन तासांमध्ये एका साखर कारखान्याचे सात वजनकाटे तपासलेच कसे? इतर कारखान्यांत चार-पाच काटे तपासणीसाठी दोन-अडीच तास लागले. काटे चार-पाच आहेत, त्या ठिकाणी वजन एकच कसे? असाही सवाल पाटील यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com