Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Crop Insurance : पीकविमा कंपनीची बंद कार्यालये तातडीने सुरू करा

Crop Insurance Scheme : पीकविम्याबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी असताना कंपनीने गेल्या काही दिवसांपासून कार्यालयांना कुलूप लावून ठेवले आहे.
Published on

Akola News : पीकविम्याबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी असताना कंपनीने गेल्या काही दिवसांपासून कार्यालयांना कुलूप लावून ठेवले आहे. परिणामी शेतकऱ्यांची अडचण होत असल्याने पीकविमा कंपनीने तातडीने कार्यालये पूर्ववत करावीत, अशी सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

या बाबत गुरुवारी (ता. ७) दिलेल्या पत्रात एचडीएफसी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सुनील भालेराव यांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा कंपनीचे कार्यालय पूर्ववत सुरू करण्याचे सूचवले आहे.

विमा कंपनीने गेल्या महिन्यापासून पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील विमा कंपनीचे कार्यालये बंद केली असल्याबाबत पत्राद्वारे कळवले होते. तेव्हापासून ही कार्यालये कुलूप बंद ठेवली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीक विम्याचा क्लेम पाहिजे तर काय करायचं?

पीकविमा योजनेमध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमध्ये विमा रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामधील विमा रक्कम प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांकडून सातत्याने कृषी विभागाकडे विचारणा केली जात आहे.

मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. शिवाय नोव्हेंबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे वेळेवर निराकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपनीचे तालुका व जिल्हास्तरावरील कार्यालये त्वरित सुरू करण्यात यावी, असेही सूचवले आहे.

Crop Insurance
Banana Crop Insurance : केळी पीक शेतात, तरीही ते नसल्याचा प्रशासनाचा शोध

नकार कंपनीचा आणि म्हणे, संपर्क करा कृषी खात्याकडे

विमा कंपनीच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना विमा कंपनीमार्फत नाकारण्यात आल्या आहेत. कंपनीने शेतकऱ्यांची पूर्वसूचना नाकारली असताना शेतकऱ्यांना नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करा, असा संदेश देण्यात येत आहे.

वास्तविक पूर्वसूचना विमा कंपनीने नाकारली असल्यामुळे त्याबाबत कृषी विभागाकडे कुठलीही माहिती नाही. शेतकरी कृषी विभागात जाऊन अधिकाऱ्यांसोबत वादविवाद घालत आहेत. काही शेतकरी प्रतिनिधींनी कृषी विभागात अधिकाऱ्यांसोबत याविषयावरून हुज्जत घातली.

परिणामी विमा संदेशामध्ये कृषी विभागाशी संपर्क करा या ऐवजी नजीकच्या विमा कंपनी कार्यालय/विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा, अशी दुरुस्ती त्वरित करण्यात यावी असेही सुचवण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com