Swapnil Shinde
यंदा दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे शेती पिके मोठे नुकसान झाले.
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील काढणी आलेली पिके आणि नुकत्याच पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन प्रकारे विम्याचे क्लेम मिळतात. एक नैसर्गिक आपत्तीमुळे पीक खराब होते. आणि दुसरे कीडरोगामुळे उत्पन्नात सरासरीपेक्षा कमी उत्पन्न निघते.
पिकाचे उत्पन्न सरासरी पेक्षा कमी असल्यास विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो.
अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे शासनाने विमा कंपन्यांना अग्रीम पीक विमा देण्याचे आदेश दिले
कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैस वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून पीक विमा कंपन्यांकडे अर्ज करणे गरजे आहेत.