Sugarcane Season : भंडारकवठ्याच्या लोकमंगल शुगरचे बॉयलर प्रदीपन

Lokmangal Sugar : भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकमंगल शुगर इथेनॅाल अॅण्ड को-जनरेशन इंडिया लिमिटेडच्या यंदाच्या गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन नुकतेच कृषिभूषण संजीव माने आणि प्रगतिशील शेतकरी सोमनाथ हुलगे यांच्या हस्ते नुकतेच झाले.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon

Solpaur News : भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकमंगल शुगर इथेनॅाल अॅण्ड को-जनरेशन इंडिया लिमिटेडच्या यंदाच्या गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन नुकतेच कृषिभूषण संजीव माने आणि प्रगतिशील शेतकरी सोमनाथ हुलगे यांच्या हस्ते नुकतेच झाले.

या वेळी कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख, संचालक पराग पाटील, वर्क्स मॅनेजर श्रीकांत मोरे, प्रोडक्शन मॅनेजर गुणशेकरन, मुख्य शेती अधिकारी दीपक नलावडे, अखिल बिटे, पद्मराज, विठ्ठल देशमुख, एचआर मॅनेजर विवेक पवार, नंदकिशोर कदम, श्रीशैल लोखंडे उपस्थित होते.

Sugarcane Season
Sugarcane Season 2023 : ‘सिद्धनाथ’ने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विश्वासार्हता जपली’

कारखाना कार्यस्थळावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषिभूषण माने यांचे एकरी शंभर टन ऊस उत्पादन यावर व्याख्यान झाले. त्यात त्यांनी ऊसलागवडीपासून ते तोडणीपर्यंतच्या व्यवस्थापनासह पाणी नियोजन आणि अन्य तांत्रिक बाबींची माहिती दिली.

Sugarcane Season
Sugarcane Season 2023 : ‘विघ्नहर’चे १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

या वेळी अध्यक्ष महेश देशमुख म्हणाले, यंदाच्या गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा लवकर गाळप सुरू होणार आहे. सभासद शेतकऱ्यांनी आजपर्यंत आमच्यावर विश्वास दाखवला आहे. येणाऱ्या हंगामातही ऊस घालून सहकार्य करावे, या हंगामात आपल्याला विक्रमी गाळप करायचे आहे.

संचालक पाटील म्हणाले की, यंदाही दिवाळी सणासाठी सभासदांना साखर वाटण्यात येत आहे. तसेच सलग तीन वर्षे ऊस देणाऱ्या ऊस उत्पादकांनाही अल्पदरात साखर देण्यात येणार आहे, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com