Sugarcane Season 2023 : ‘सिद्धनाथ’ने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विश्वासार्हता जपली’

Sugarcane Farmer : सिद्धनाथ साखर कारखान्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुका व सिना-भिमा पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली.
Siddhanath Sugar Factory
Siddhanath Sugar FactoryAgrowon

Solapur News : येथील सिद्धनाथ साखर कारखान्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुका व सिना-भिमा पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली, तर कारखान्याचे नियोजनबद्ध कामकाजामुळे शेतकरी विश्वासाने कारखान्यास ऊस पुरवठा करीत असल्याचे प्रगतशील शेतकरी गंगाधर बिराजदार यांनी सांगितले.

तिऱ्हे येथील सिद्धनाथ कारखान्याच्या तेराव्या गळीत हंगाम बॉयलर प्रतिपादन समारंभात बोलत ते होते. यावेळी प्रथमेश पाटील व गंगाधर बिराजदार या शेतकरी दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, उपाध्यक्ष डॉ.पृथ्वीराज माने, आप्पासाहेब काळे, शिवा होसाळे, चंद्रकांत खुपसंगे, नागेश बिराजदार, श्रीशैल पाटील, राम गायकवाड, सचिन गुंड, तोहीद पटेल, नागेश स्वामी आदी उपस्थित होते.

Siddhanath Sugar Factory
Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबरोबर कोकण कृषी विद्यापीठाचा करार

शेतकरी बिराजदार यांनी आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना बॉयलर प्रतिपादन समारंभास बोलावून केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग केला. भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे,

Siddhanath Sugar Factory
Sugarcane FRP : ऊस दराची कोंडी फुटणार कशी?

अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांचा ऊस गाळपासाठी वेळेत आणण्याचा कारखाना प्रयत्न राहील, तर या हंगामात सहा लाख टन ऊस गाळपकरण्याचा मनोदय कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने यांनी व्यक्त केला.

यावेळी जनरल मॅनेजर संजय जाधव, प्रोजेक्ट मॅनेजर बाळासाहेब काळे, चिफ केमिस्ट धुळा शेंबडे, रामचंद्र वाकडे, धनंजय पाटील सह कारखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com