Jalna Sand Auction : जालना जिल्ह्यातील अठ्ठावीस वाळू घाटांच्या लिलावाची लगीनघाई

Maharashtra Sand Policy : राज्य शासनाच्या वाळू लिलावाचे नवीन धोरणामुळे लांबणीवर पडलेल्या वाळू घाटांची अखेर लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.
Sand Excavation
Maharashtra Sand Policy Agrowon
Published on
Updated on

Jalna News : राज्य शासनाच्या वाळू लिलावाचे नवीन धोरणामुळे लांबणीवर पडलेल्या वाळू घाटांची अखेर लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत. नवीन धोरणानुसार प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून नवीन नियमांचे अवलोकन सुरू आहे.

दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया जवळपास संपलेली असते. मात्र, यंदा राज्य शासनाच्या नवीन वाळू लिलाव धोरणांमुळे वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया थांबली होती. अखेर एप्रिल महिन्यात राज्य शासनाकडून वाळू लिलावाचे नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या लिलाव धोरणाचे अवलोकन सुरू झाले आहे.

Sand Excavation
Maharashtra Sand Policy: फार्स नव्या धोरणाचा!

शिवाय या नवीन धोरणानुसार वाळू घाट लिलावाची प्रक्रिया करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात महसूल आयुक्तांसोबत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामुळे आता वरिष्ठ स्तावरून येणाऱ्या आदेशानुसार लिलाव प्रक्रियेला सुरवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Sand Excavation
Solapur Sand Auction : सोलापूर जिल्ह्यातील १५ ठेक्यांमधून घरकुलांसाठी मोफत वाळू

या घाटांचा होणार लिलाव

जिल्ह्यातील २८ वाळू घाटांचा लिलाव होणार आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील वालसा- खासला २, वालसा डावरगाव, गव्हाण संगमेश्वर. जाफराबाद तालुक्यातील जवखेडा, गोकुळवाडी, सावंगी, देऊळगाव उगाळे, मेरखेडा, भोरखेडी गावकी. परतूर तालुक्यातील सावरगाव बु., अंबा नांद्रा, गोळेगाव. मंठा तालुक्यातील कानाडी उस्वद, घनसावंगी तालुक्यातील गुंज बु. सिरसवाडी, गुंज बु. गवठाण, चित्रवडगाव, गुंज बु. काळुंकामाता वस्ती, भुतेगाव, अंबड तालुक्यात घुंगर्डे हादगाव, झोडेगाव, साडेसावंगी, रेवलगाव, बठान खु., सष्टपिंपळगाव २, डोमलगाव, गंधारी या ठिकाणच्या वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.

या नद्यांवर वाळू घाटांचे होणार लिलाव

 जिल्ह्यातील गोदावरी, गिरिजा, पूर्णा, धामना, दुधना, गल्हाटी या नद्यांमध्ये वाळूसाठा आहे. या नद्यांवर २८ वाळू घाटांच्या लिवावाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून, लिलावासाठी मान्यताही मिळाली आहे. आता केवळ ऑनलाइन निविदा काढणे बाकी आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मार्ददर्शक सूचनांची प्रतीक्षा केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com